Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   आजची आरोग्यटीप 14.09.16

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 
            *आहाररहस्य.*

          

आपण भारतीय उजव्या हाताने जेवतो. आणि एकाच हाताने जेवायचे असते. अन्नाला दोन्ही हात लावून जेवू नये. पाश्चात्य लोक दोन्ही हातात काटे, चमचे सुर्‍या घेऊनच फडशा पाडतात. त्यांची तशीच संस्कृती आहे. 

पण आपण भारतीय लोक फक्त उजवा हातच अन्नाला लावतो कारण डावा हात  ✌ दोन नंबरसाठी वापरत असल्याने जेवण्यासाठी निषिद्ध समजला आहे.
नैवेद्य दाखवून सहा चवींनी सज्ज असलेले जेवणाचे ताट. वाट बघतंय, सुरवात करण्याची. ! 
मुख्य जेवणाला सुरवात करताना गोड पदार्थाने करावी. हा पदार्थ ताटात अगदी उजव्या बाजूला वाढावा, जेणेकरुन जेवताना उजव्या हाताला अगदी सहज मिळेल.
आता वरणभात जेवावा. त्यावर लिंबू पिळावे, म्हणजे रक्त वाढायला मदत होते. असे  सुप्रसिध्द डॉ. ह.वि. सरदेसाई यांनी एका व्याख्यानात सांगितले होते. की, डाळीमधील एक घटक आणि ताजे कापलेले लिंबू मिळून जी प्रक्रिया होते, त्याचा परिणाम म्हणून रक्त वाढायला मदत होते.
मधुर रसाचा वरणभात जेवत असताना मधेमधे आमटीचा भुरकाही मारावा. ऊसळ आणि भाज्यापण चाखून पहाव्यात. या आमटी, उसळ, भाजीच्या वाट्या पानाच्या उजव्या बाजूला असतात. ज्या चवीला तिखट आणि  तुरट असतात. 
हो, आणखी एक. जेवणात पुरेसा गोड पदार्थ जर असेल, तरच तुरट चवीच्या भाज्या खाव्यात,  (केवळ डाएटींगच्या नावाखाली,  तुरट चवीच्या भाज्याच खाण्याची हौस असेल तर, होणार्‍या वाताच्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल.)
तोंडी लावायला चटणी, कोशींबीर, दही, लोणचे, पापड, असतातच. पण फक्त तोंडी लावण्यापुरतेच हे पदार्थ खायचे. 

हे आंबट, कडू, खारट पदार्थ पानाच्या डाव्या बाजुला वाढलेले असतात.
पाणी जेवताना मधे मधे प्यावे. म्हणून तर ते सुद्धा डाव्या बाजुलाच ठेवलेले असते.
जे पदार्थ उजवीकडे वाढले जातात, ते जास्त प्रमाणात पोट भरतीचे खावेत. 
आणि डाव्या बाजुचे पदार्थ प्रमाणात कमी खावेत. केवळ चव बदलण्यापुरतेच खावेत.

आणि चव निर्माण करण्यासाठी खावेत. बोटाने चाटून खावेत.
शेवटी सगळं चाललंय, खाण्यासाठी.

चवीने, चवीसाठी ! 
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021.

14.09.2016

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s