Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   आजची आरोग्यटीप 04.09.16

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 
            *आहाररहस्य.*

          

           *वदनी कवल भाग 1*
वदनी कवल घेता

नाम घ्या श्रीहरीचे

सहज हवन होते

नाम घेता फुकाचे

जीवन करी जिवित्वा

अन्न हे पूर्ण ब्रह्म

उदर भरण होणे 

जाणिजे यज्ञकर्म
हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया.
मुखी घास घेता करावा विचार.

कशासाठी हे अन्न मी सेवणार

घडो माझे हाती नित्य देशसेवा

म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा
असा परिवर्तित श्लोक देखील म्हटला जातो. हे श्लोक सामुहीकरीत्या म्हटले जातात. 

समुहाने किंवा एकत्रितरीत्या हे श्लोक म्हणण्याचा एक वेगळा अर्थ अपेक्षित आहे.
आपण सारे एक आहोत, 

सहनाववतु सहनौ भुनक्तु 

यामधे देखील तोच अर्थ अभिप्रेत आहे.

*एकत्र बसून* भोजन करणे, हे एकमेकांची शक्ती वाढवणारे आहे.
आजकालच्या प्रथेनुसार  *एकत्र* जरी आलो तरी, *बसून* भोजन काही होत नाही. ते यथाकालोद्भव उभ्याउभ्याच होते. डाव्या हाताने कधीही वाढू नये, वाढून घेऊपण नये.  पण डाव्या हाताने घेतल्याशिवाय *बुफेभोजन* होतच नाही. याकरीता, ( फार फार वर्षा) पूर्वी (सौ.) अन्नपूर्णा सर्वांना वाढून नंतरच आपण जेवायला बसत असे. जे काही हवे ते एकदाच घेऊन नंतरच ती जेवत असे. वाढपी लोकांची संगत हीच तिची पंगत. पण तिच्या चेहर्‍यावर इतरांना वाढण्याचे समाधान झळकत असे.
सर्व पदार्थ वाढून पूर्ण झाल्यावर, अन्नशुद्धी वाढली जाई. 

अन्नशुद्धी म्हणजे लोणकढे तूप. 

हे तूप (आडव्या चमच्याने) वाढून झाले की, आता आणखी पदार्थ ताटात येणे शिल्लक नाही, असा जणुकाही इशाराच जेवणार्‍यांना मिळत असे.

म्हणजे अन्नशुद्धी वाढून होईपर्यंत, समोर वाढलेल्या ताटाला हातही लावायचा नाही. असा अलिखित नियमच होता त्यावेळी.
कोशींबीर वाढून होईपर्यंत लोणचे संपलेले, भाजी येईपर्यंत कोशींबीर संपवलेली. याला सहभोजन म्हणत नाहीत. 
आता पंगतही कालबाह्य झाली आहे.
एका ओळीत मांडलेली केळीची हिरवीगार पाने, त्यावर रंगीबेरंगी पदार्थांनी सजलेलं आणि गच्च भरलेलं ताट, उदबत्यांचा सुवास, 

एका सुरात, एका तालात म्हटलेले श्लोक, हा सर्व माहोल पाहून आधीच अग्निनारायण अवतीर्ण झालेले असत. आणि वाट बघत बसलेले असत फक्त गजराची ! 
जय जऽय रघुवीर समर्थ ऽऽऽ

हरऽऽहर महाऽऽदेव
आणि नंतर *आक्रमणाला* जी सुरवात होई, ती अग्निनारायणाने अगदी *तथास्तु* म्हणेपर्यंत. 
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021.

04.09.2016

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s