Health

आधी डोळे तपासले असते तर खूप बर झालं असत !!!!!!!!!

​#Netrayu
आधी डोळे तपासले असते तर खूप बर झालं असत !!!!!!!!!
असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का? 

परवा आई व तिची दहा वर्षांची मुलगी कडेच्या दुकानात आल्या होत्या. मुलगी आईची नजर चुकवून दवाखान्यात आली. मी म्हटलं “हा डोळ्यांचा दवाखाना आहे. तुझे डोळे तपासायचे आहेत का?”. तेवढ्यात तिची आई तिला शोधत आली. तिने आईला ‘माझे डोळे तपासायचे का?’असे विचारले. तेव्हा ‘तिचे डोळे चांगले आहेत,नेत्र तपासणीची तिला गरज नाही’ असे cofidently सांगितलं. पण बाल हट्टापुढे तिला नमते घ्यावे लागले. तपासणी अंती तिची नजर कमी असल्याचे निष्पन्न झाले. आईचा यावर विश्वासच बसत नव्हता. शेवटी ‘आधी डोळे तपासले असते तर खूप बर झालं असत’ असं म्हणण्याची वेळ आली.
 आपल्या मुलाच्या बाबतीतही असे घडू शकते. यासाठी आपल्या मुलाच्या पुढील हालचालींवर लक्ष ठेवल्यास त्याला द्ल्यांचा आजार आहे असे समजावे.
1. नेहेमी TV फार जवळून पाहणे.

2. पुस्तक जवळ घेऊन वाचणे.

3. डोके किंवा डोळे वाकडे करून वाचणे.

4. सतत डोळे चोळणे.

5. उजेडाचा डोळ्यांना त्रास होणे व त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे.

6. दूरचे कमी दिसत असल्यामुळे मैदानी खेळामध्ये तसेच जवळचे कमी दिसत असल्यामुळे अभ्यासात टाळाटाळ करणे.

7. डोकं दुखतंय अशी वारंवार तक्रार करणे.

8. अभ्यासात मागे पडणे.
 अशाप्रकारे आपल्या मुलास कोणतीही समस्या असल्यास त्वरित नेत्र तपासणी करून घ्या. कारण योग्य वेळी डोळे तपासणी केली गेली की त्यावर मार्ग सापडतो. नाहीतर आपणही नंतर म्हणाल- “आधी डोळे तपासले असते तर खूप बर झालं असत”.
डॉ. निखिल माळी.

M.S.(Ayu)

नेत्ररोगतज्ज्ञ

||श्रीव्यङ्कटेश नेत्रालय॥

चिपळूण

९४२१३००५९१
Nikhil Mali

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s