Ayurved · Health

अजीर्णाची कारणे

​😬 अजीर्णाची कारणे😁
अत्यंबुपानाद्विषमाशनाश्च सन्धारणात्स्वप्नविपर्य्ययाच्च |

काले$पि सात्म्यं लघु चापि भुक्तमन्नं न पाकं भजते नरस्य || वंगसेन
१ अतिअंबुपान — जेवताना वा इतर वेळी अत्याधिक प्रमाणात जलपान करणे अजीर्ण उत्पतीचे कारण बनते

त्याकरिता खालीलप्रमाणे जलसेवन करावे…
🍀 पाणी पिण्याचा विधी 🍀
अत्यम्बुपानाच्च विपच्यते$न्नं निरम्बुपानाच्च स एव दोषः|

तस्मान्नरो वह्निविवर्द्धनाय मुहुर्मुहु..
फार पाणी प्याले तर अन्न चांगले पचत नाही, तसेच पाणी पिलेच नाही तरी अन्न नीट पचत नाही. त्यामुळेच मनुष्याने

अग्निप्रदीप्ति (भुक वाढीसाठी) करिता थोडे थोडे जलसेवन करावे….
२.विषमाशन —  अकाले बहु चाल्पं वा भुक्तं तु विषमाशनम् |

                      अवेळी , थोड्या प्रमाणात किंवा फार कमी प्रमाणात खाणे होत असल्यास अजीर्ण होऊ शकते.
3. वेगधारण — मल मुत्राचे वेग आलेले असताना अडवुन ठेवल्याने वात बिघडुन अजीर्ण निर्माण होते.

१३ अधारणिय वेगांचे कधीही धारण करू नये.
४.स्वप्नविपर्यय — नेहमी रात्री जागरण केल्याने रूक्षता वाढीस लागुन भुक कमी झाल्याने अजीर्ण होऊ शकते.

    रात्री जागरण झाल्यास सकाळी जागरणाच्या निम्मा वेळ जेवनापुर्वी झोपुन घ्यावे.
५. दिवास्वप्नं — दिवसा जेवनानंतर झोपल्याने कफपित्त वाढुन अजीर्ण निर्माण होते. 
वरील कारणांमुळे वेळेवर व हलके अन्न खाणारया लोकांना अजीर्णाचा त्रास होतो.
☘ अजीर्णाची मानसिक कारणे 🍀

 ईर्षा, भिती, क्रोध, लोभ, शोक, दैन्य, द्वेष या मानसिक कारणांनी केलेले भोजन व्यवस्थित पचत नाही.
☘नेहमी नेहमी अजीर्णाचे उपद्रव 🍀

मुर्च्छा प्रलापो वमथुः प्रसेकः सदनं भ्रमः| उपद्रवा भवन्त्येते मरणञ्चाप्यजीर्णतः ||
मूर्च्छा, प्रलाप, उलटी, मुखातुन लाळ गळणे, ग्लानि उत्पन्न होणे, चक्कर येणे हे उपद्रव निर्माण होतात. तसेच मरण देखील उपद्रव स्वरूपी येऊ शकते.
अजीर्णात कारणानुरूप केलेली चिकित्सा फलदायी ठरते. एकच उपाय सर्वांना उपयोगी ठरत नाही.

कारणे टाळली तर नेहमी नेहमी अजीर्णाचा त्रास ही होणार नाही.

नेहमी होणारया अजीर्णाकडे होणारे दुर्लक्ष त्रासदायक ठरते काहीवेळा जीवावरही बेतु शकते.. अजीर्णात दुर्लक्ष करू नये हे पक्के लक्षात असावे.
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद नांदेड

Mob no – 9028562102, 9130497856

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s