Ayurved · Health

बोहरा थाल…..असाही आयुर्वेद!!

​#घरोघरी_आयुर्वेद
बोहरा थाल…..असाही आयुर्वेद!!
शीर्षक वाचून कित्येकांना आश्चर्य वाटले असेल. बोहरा हा मुस्लिम समाजातील एक उपपंथ. वेहरु म्हणजेच व्यापार हा परंपरागत उद्योग असल्याने ‘बोहरा’ असे त्यांचे नामकरण झाले. या समाजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे सहभोजनाची प्रथा. यालाच ‘बोहरा थाल’ असे म्हटले जाते.
जेवणापूर्वी ‘शुचि’ म्हणजे स्वच्छता महत्वाची असे आयुर्वेदाचे ठाम मत. कित्येक ठिकाणी जेवणापूर्वी स्नान करावे असाही संदर्भ आढळतो. बोहरा थालमध्ये जेवण सुरु करण्यापूर्वी चांदीच्या सुरईत भरलेल्या पाण्याने चांदीच्या थाळीत हात धुण्याची प्रथा आहे. आयुर्वेद सांगतो; ‘भोजनाग्रे सदा पथ्यं लवणाद्रकभक्षणम्।’ म्हणजे जेवणाच्या सुरुवातीस आल्याचा तुकडा सैंधव मीठासह खावा. (पित्त प्रकृतीच्या लोकांनी हा प्रयोग करू नये.) असे केल्याने भूक वाढते आणि पचन उत्तमरीत्या होते. बोहरा थालची सुरुवात होते थोडेसे सैंधव चाखून! जेवणाच्या सुरुवातीस कोरडा घास घेऊ नये असे आयुर्वेद सांगतो. तसे केल्याने ठसका लागू शकतो; यासाठीच आपल्याकडे परंपरेने तुपाची आपोष्णी घेण्यात येते. अर्थात आजकाल या गोष्टींना आम्ही वेड्यात काढून वा जातीयवादाचा रंग देऊन अडगळीत टाकले आहे हा भाग वेगळा. बोहरा समाजाचे मात्र तसे नाही. ते थालचा पहिला घास घेतात तो ‘सोडन्नु’चा. हा पदार्थ म्हणजे शिजलेल्या भातात तूप आणि किंचित पिठीसाखर होय. सोडन्नुचा एक घास म्हणजे थालची सुरुवात. स्वीट डिश ही जेवणाच्या शेवट न खाता सुरुवातीस खावी असे आयुर्वेद सांगतो. असे केल्याने वाताचे शमन होते आणि आपण मर्यादेपेक्षा अधिक जेवत नाही. बोहरा थालमधील पहिला पदार्थ असतो ‘मिठास’ म्हणजेच कोणती तरी मिठाई. यांनंतर जेवणास सुरुवात करून अन्य शाकाहारी- मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि शेवट करताना पुन्हा किंचित मीठाचा वापर केला जातो.
आयुर्वेदाचे नियम ठराविक समाजालाच वा देशालाच लागू होतात का? असा प्रश्न काहीजण खोडसाळपणे विचारतात. हे त्याचे उत्तर. आयुर्वेद वैश्विक आहे. मात्र दुर्दैवाने त्याच्या जन्मभूमीतच तो दुर्लक्षित असून अन्यत्र अनेक ठिकाणी त्यातील उपदेशाचे पालन केले जाते.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)

आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते

।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली

संपर्क: ०२५१-२८६३८३५

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s