Ayurved · Health

​अंघोळ 

​अंघोळ  
अंघोळ किंवा  स्नान हा एक मजेशीर  प्रकार आहे ,म्हणजे असे की अंघोळ  आवडणारे आणि न आवडणारे  असे दोन प्रकारचे लोक आपल्या आसपास  असतात .एक वर्ग असा की अंघोळ कर म्हटलं तर पट्कन तयार होणारा आणि भरपूर पाणी घेऊन ,मस्त गाणं वगैरे म्हणत ,निवांतपणे अंघोळ एन्जॉय करणारा आणि दुसरा वर्ग याच्या अगदी विरुद्ध म्हणजे जितकी टाळाटाळ करता येईल तेव्हढी करणारा .अंघोळही काही दिनचर्येतील आवश्यक गोष्ट नाही असे यांचे ठाम मत असते .घराच्या सगळ्यांचा आरडाओरडा झाला की मग हे नाईलाजाने कसे बसे  २/४ तांबे अंगावर ओतून कावळ्याची अंघोळ उरकतात आणि पट्कन बाथरूमच्या बाहेर येतात .काय वैताग आहे असा भाव यांच्या चेहऱ्यावर असतो .

बहुतेकवेळा अंघोळ ही एक routine प्रक्रिया म्हणून करणारे जास्त जण सापडतात पण ही अंघोळ वाटते तितकी  साधी नसते बऱ.
गरम किंवा गार पाण्याने अंघोळ करणं ही शरीराच्या दृष्टीने एक गुंतागुंतीची  प्रक्रिया आहे .आपल्या शरीराचे एक ठराविक तापमान आपोआप नियंत्रित केले जात असते आणि तरच आपल्या सर्व शरीरक्रिया व्यवस्थित सुरु राहू शकतात .आपली त्वचा हे एक अतिशय महत्वाचे ज्ञानेंद्रिय  आहे.स्पर्शाबरोबरच शरीराचे तपमान नियंत्रण हे फार महत्वाचे काम त्वचा करते त्यामुळे अंघोळ या प्रक्रियेत खूप उर्जा किंवा energy पण खर्च होत असते .जेव्हा आपण थंड पाण्याने अंघोळ करतो तेव्हा आपला श्वास एकदम थांबल्यासारखा होतो ,एकदम घाबरल्यासारखे होते कारण तो त्वचेसाठी एकप्रकारचा shock असतो .पुन्हा शरीराचे तपमान पूर्ववत् करण्यासाठी त्वचेला खूप कष्ट पडतात ,असेच फार गरम पाणी घेतले तरी होते .म्हणून अंघोळ करताना पाणी सुखोष्ण म्हणजेच त्वचेला shock बसणार नाही तर उलट सुखावह वाटेल अश्या तापमानाचे घ्यावे,विशेषतः डोक्यावरून अंघोळ  करताना तर हे अधिकच महत्वाचे आहे कारण डोक्यात मेंदूसारखा अतिशय महत्वाचा अवयव  सुरक्षित ठेवलेला असतो जो पूर्ण शरीराचा व्यापार चालवतो आणि डोळे हे अतिशय नाजूक ज्ञानेंद्रिय फार गरम पाण्याचा स्पर्श सहन करू  शकत नाही .

आंघोळीचे इतर परिणाम आणि फायदे या विषयी  जाणून घेऊ उद्या .तोपर्यंत Take care .
वैद्य राजश्री कुलकर्णी

M.D. ( आयुर्वेद)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s