Ayurved · Health

प्या प्या, पाणी प्या

#सामान्य_आयुर्वेद

प्या प्या, पाणी प्या-

पाणी प्यावं पण जरा कमीच, असं अायुर्वेद सांगतं. आता कमी म्हणजे किती हा प्रश्न पडणे साहजिक.

खरं तर आपल्या शरीराला जेवढं अावश्यक आहे तेवढं पाणी आपल्याला अापल्या अाहारातून मिळत असतं. सामान्य शारीरिक काम करणाऱ्या मनुष्याला त्यापेक्षा जास्त पाण्याची गरजच नसते. जेंव्हा ही शारीरिक कामे वाढू लागतात, तेंव्हा मात्र पाण्याची गरज भासते. आणि ही गरज आपल्या लक्षात येण्यासारखी असते. अर्थात गरज असताना शरीर मागणी करते. तहान लागते, घसा कोरडा पडतो, श्वास लागतो, चक्कर येते. हे सर्व अंगमेहनतीचा परिणाम म्हणून जेंव्हा होतं तेंव्हा आपल्याला पाण्याची गरज आहे असं समजावं. तेंव्हा आणि फक्त तेंव्हाच पाणी प्यावं. ते सुद्धा गटागट बाटल्यांवर बाटल्या नाही. थोडं थोडं, दमादमाने.

आयुर्वेदानुसार शरद आणि ग्रीष्म ऋतूखेरीज इतर सर्व ऋतूंमधे अत्यल्प पाणी प्यावे.

त्याशिवाय पाणी प्यावे ते जेवणा सोबत. आयुर्वेद म्हणतं जेवणा आधी किंवा जेवणानंतर भरपूर प्रमाणात पाणी पिऊ नये. काही विशिष्ट अवस्था सोडल्या तर नेहमी पाणी हे जेवणा सोबतच प्यावं. जेवण घेताना मधून मधून, एक एक घोट पाणी प्यावं. इथे सुद्धा भरपूर पाणी पिऊ नये. थोडं थोडं, दमादमाने.

काहींना जेवताना प्रत्येक घासासोबत पाणी पिण्याची सवय असते. जेवण होईपर्यंत ताटाभोवती बरेच रिकामे तांब्ये (किंवा बाटल्या, आजकाल तांब्या कोण वापरतो!!!!!)असतात. ही सुद्धा चुकीची सवय आहे. असे केल्याने आहार घेण्याचे प्रमाण बिघडते अाणि आपल्या पाचक-अग्नीला पाणी पचवण्यावर जास्त भर द्यावा लागतो.

सकाळी उठल्याबरोबर तांब्याभर आणि रात्री झोपण्यापुर्वी तांब्याभर पाणी पिऊ नये. असे केल्याने पचन संबंधी अनेक विकार होतात. त्यामुळे ही सवय असली तरी बंद करावी.

योग्य समय, हीच पाणी पिण्याची योग्य सवय.

©वैद्य अमित पाळ, MD(Ayu)
॥श्रीव्यङ्कटेश अायुर्वेद॥
गोमंतक
email- dramitsva@gmail.com

Vaidya Amit Pal

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s