Ayurved · Health

सेल्फी एल्बो

आयुर्वेद कोश

FB_IMG_1471873105519.jpg~ सेल्फी एल्बो !!

साल 2004-2005 असेल . सचिन तेंडुलकर एक ‘इंज्युरी ‘ मुळे चर्चेत आला . ‘टेनिस एल्बो ‘ !! भारतीय वृत्तपत्रे रकानेच्या रकाने या टेनिस एल्बो वर लिहीत होती . कारण ‘देवतेला ‘ झालेली इंज्युरी आणि लोकांची नक्की काय झाले आहे ? याबाबत उत्सुकता . . .

साल 2016 , NBC TODAY याचा होस्ट ‘ Hoda kotb ‘ याचे ‘सेल्फी एल्बो ‘ असे झालेले निदान !! यामुळे होडा आणि सेल्फी एल्बो दोन्ही चर्चेत आहेत . . . आज थोडंसं या सेल्फी एल्बो बाबत !!

फेसबुक असो वा इंस्टाग्राम . . . चहाची टपरी असो किंवा मॅरीयॉट आपण ‘चल बेटा सेल्फी ले ले रे ‘ या धुंदीत ‘असतोच ‘ .

जे जे आपण करावे . .
ते ते सर्वास दाखवावे . .
अखंड सेल्फी काढावे . .
सकल जनांनी

अशी चारोळी किंवा तरुणाईचा ‘अभंग ‘ सहज रचता येईल . . एकंदरीत काय ‘पाऊट ‘ करत आणि वेडी वाकडी तोंड करत ‘सेल्फी ‘ काढणे ‘मस्ट ‘ यु नो . . . . तर हे सेल्फी काढायचे ‘छंद कम व्यसन ‘ सेल्फी एल्बो या आजाराला जन्म देते . . .

याची लक्षणे म्हणजे एल्बो /कोपर प्रदेशी होणाऱ्या प्रचंड वेदना, स्नायू जखडल्या सारखे वाटणे आणि सूज !!
University of Minnesota यांनी the journal Human Medicine या जर्नल मध्ये प्रकाशित केलेल्या लेखानुसार . . . सेल्फी एल्बो ,टेनिस एल्बो , गॉल्फर एल्बो यामागील कार्यकारण भाव एकच आहे . . . . स्नायूंचा केलेला अतिरिक्त आणि अयोग्य वापर !! सेल्फी काढत असताना केलेल्या चित्रविचित्र हालचाली आणि सर्व एकाच सेल्फी मध्ये यावेत यासाठी केलेली खटपट हातावरील repetitive torque on the elbow’s ulnar collateral ligament (UCL) and radial collateral ligament (RCL) यावर भार टाकते . प्रथम वेदना , नंतर सूज , याहून अधिक वापर झाला तर मसल टीअर अशा चढ्या क्रमाने दुष्परिणाम होत जातात . याचे नाव ‘सेल्फी एल्बो ‘ !!

आयुर्वेदानुसार कोणत्याही अवयवाचा अयोग , हीन योग आणि अति योग या घातकच . सर्व आजारांच्या मागे यापैकी एक कारण असतेच . तर या सेल्फी एल्बो प्रकारात आभ्यंतर औषधे , पंचकर्म यातून उपचार करणे शक्य आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे ‘ निदान परिवर्जन ‘ . . . ज्या कारणाने सेल्फी एल्बो झाला ते कारण बंद करून टाकणे . . ‘ए बेटा सेल्फी मत ले रे ‘ हे महत्वाचे !!

आपल्या लाईफ मध्ये ‘स्टाईल ‘ आल्या पासून जे काही नवं नवीन आजार होत आहेत हा त्यातील एक . . . अजून काय काय आजार येऊ घातले आहेत ते ‘लाईफ स्टाईल ‘ जाणे . . !!

(टीप – सेल्फी वार रविवार या दिवशीच ही पोस्ट टाकून सेल्फी भंग केल्या बद्दल माफी . . . )

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश (https://www.facebook.com/aarogyakosh/ )

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s