Ayurved · Health

बाळकडू -अंतिम भाग

आयुर्वेद कोश ~ बाळकडू -अंतिम भाग !!

बाळकडू च्या तिसऱ्या भागात आपण 10 घटक पाहिले . या भागात उरलेले 10 घटकांची प्राथमिक माहिती घेऊन ‘बाळकडू ‘ ही चार भागांची लेख माला आपण थांबवत आहोत . ही लेखमाला लिहायचे दोन प्रधान हेतू होते –
अव्वल हेतू – ‘बालरोगांच्या ‘ बाबतीत आयुर्वेदाचे महत्व लोकमानसात अधोरेखित करणे
द्वितीय हेतू – रेडिमेड बाळगुटी न घेता घरीच बाळकडू तयार करणे .

मिळालेला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया पाहता हे हेतू काही अंशी सफल झाल्याचे दिसून येते . आयुर्वेदात लहान मुलांच्या साठी उपचार आहेत किंवा काहीच नाहीत . . हे दोन्हीही गैरसमज मनी ठेवू नयेत . अष्टांग आयुर्वेदातील ‘कौमारभृत्य ‘ असे अंग बालकांचे स्वास्थ्य , रोग आणि उपचार याना समर्पित आहे. . त्यामुळे ‘ डोन्ट अंडर एस्टीमेट आयुर्वेद ‘ इतकंच सांगायला ही लेख माला !

बाळकडू हे बालकांना जसे रोगापासून वाचवते तसेच काही अस्वास्थ्याची लक्षणे दिसली तर त्यातून बाहेर सुद्धा काढते . बालकांचे स्वास्थ्य उत्तम हवे असेल तर बालकाच्या आईचा आहार आणि मनस्थिती उत्तम असणे फार आवश्यक आहे . . त्यामुळे या बाळ गुटी सोबत घरी आनंद , चैतन्य , समाधान , कौतुक , बाळ बाळंतिणीची काळजी आणि विचारपूस इत्यादी घरी नेता आणि रुजवता आले तर देशाचे भविष्य असलेली मुले -मुली ‘उपचारासाठी ‘ दवाखान्याचे हेलपाटे घालणार नाहीत . . यातच आम्हाला आनंद आहे !!

1~ सागरगोटा – थंडी , ताप आणि पोट दुखी यावरील उत्तम औषध . सागरगोटा भाजून त्यावरील टरफल काढून टाकावे . आतील पांढरा मगज घ्यावा .

2 ~ सुंठ ~ सर्दी , पडसे , ताप , खोकला , आव होणे , दूध अंगी न लागणे यावरील औषध .

3 ~ डाळिंब साल ~ मधात उगाळून दिल्याने खोकला कमी होतो . जुलाब थांबतात .

4~ कोळींजन ~ पोटातला वात बाहेर पडतो .

5 ~ सुरवारी हिरडा ~ सर्वरोग नाशक असे हे औषध आहे .

6~ बाळ हिरडा ~ पचनाच्या तक्रारी दूर होतात .

7 ~ डिकेमाली ~ दात येत असताना डिकेमाली जरूर द्यावी . याने रक्त शुद्धी होते . जंत होत नाहीत .

8 ~ इंद्रजव ~ तापावर उपयोगी असे औषध . जंत होत असतील तर डिकेमाली , विडंग , इंद्रजव ही तीन उत्तम औषधे आहेत .

9~ किरमाणी ओवा ~ अजीर्ण , पोट दुखणे -फुगणे , दूध न पचणे इत्यादी विकारात उपयोगी .

10 ~ लेंडी पिंपळी ~ उत्तम पाचक आहे . दूध पचून अंगी लागते . कफ कमी होऊन खोकला कमी होतो . ही अत्यंत उष्ण असल्याने जपून वापरावी !!

असा हा बाळकडू मधील 20 औषधींचा संच . . हा परिपूर्ण नक्कीच नाही . . यात आवश्यकतेनुसार औषधी वनस्पती कमी अधिक होऊ शकतात . त्यामुळे वैद्याच्या सल्ल्याने आपल्या बाळासाठी बाळकडूचा संच निश्चित करून घ्यावा . . लेख माळेचा शेवट करताना कधीतरी वाचलेल्या 4 ओली आठवत आहेत त्या लिहितो आणि थांबतो

प्रभो बाळ माझा चिरंजीव व्हावा
नखी रोग त्याच्या कधीही नसावा
प्रभो प्रार्थना मान्य माझी करावी
सदा आयु आरोग्य संपन्न ठेवी

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे

आयुर्वेद कोश (https://web.facebook.com/aarogyakosh/ )

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s