Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजची आरोग्यटीप 23.07.16
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आहाररहस्य*

*उपवास भाग 4*

प्रांत, प्रदेशानुसार, भौगोलिक परिस्थिती नुसार, उपलब्ध अन्नपदार्थानुसार, धर्म, आणि रूढी परंपरे प्रमाणे उपवास केले जातात.

उपवास या शब्दाचा अपभ्रंश होऊन उपास शब्द बनला आहे. खरंतर आयुर्वेदाचा *उपासक* म्हणून “लंघन” हाच शब्द योग्य आहे.
पचायला हलके लघु असे अन्न सेवन करणे. म्हणजे लंघन !

हिंदू परंपरेनुसार एखादी गोष्ट धार्मिकतेला जोडून घेतली की ती *लघु* होते, म्हणजे लवकर पचनी पडते. म्हणूनच लंघनाला धर्म जोडून दिला गेला आणि उपवास ही रूढी तयार झाली असावी.

धार्मिक वृत्तीने रहाणे ही भारतीयांची मानसिकता आहे. आजही भारतात देवधर्म *मानणारा* जवळपास 70 ते 80 टक्के समाज आहे. ( धर्माचा अभ्यास नसल्याने, देवधर्म *समजणारा* कमी आहे ही गोष्ट वेगळी ! )

जे जे उपचार देवासाठी,
ते ते सर्व देहासाठी !

विशिष्ट पदार्थच उपवासाला चालतात, काही चालत नाहीत, यात काय मोठे विज्ञान आहे ?

माझ्याजवळ आहे, पण त्याचा उपभोग (काही काळ) घ्यायचा नाही, हे मनावरील स्वतः घालून घेतलेले बंधन, मनाची शक्ती कित्येक पटीने वाढवते, हे भारतीय मानसशास्त्र आहे. हे बंधन समजावे म्हणून, त्याला जोड दिली पापपुण्याची !

लोकांना सहजसुलभ समजेल, त्यांना ते करावेसे वाटेल, अश्या आरोग्य योजना केल्या तर त्यात त्यांचे हित आहे, हे जाणून, *पाप पुण्य* संकल्पना रूढ झाली.

उपवास केला कि *पुण्य* मिळते, उपवास मोडला तर *पाप* लागते, अशी भीती निर्माण केली गेली. खरंतर यात नुकसान काहीच नव्हतं, पण पाप बिप काही लागत नसतं, ही बुद्धीवाद्यांची संकल्पना जोर धरू लागली आणि मनातील पापपुण्याची *भीती* कमी केली गेली.

त्यामुळे नवीन पिढी मूळ उद्देश विसरत गेली. पुढे पुढे उपासाची संकल्पना बदलत गेली, (काही तज्ञ जाणकारांकडून बदलवली गेली, ) आणि संस्कृतीमध्ये विकृती निर्माण झाली.

पावसाळ्यातील दमट, ढगाळ वातावरण, वात आणि कफ दोष वाढवणारे असते. योग्य वेळी, योग्य काळजी घेतली नाहीतर, वात कफाचे आजार जोर करतात. अशावेळी जीभेवर *संयम* असावा, म्हणजे आपोआपच वात आणि कफ आटोक्यात राहू शकतील, सहज *लंघन* घडेल अशी ही आरोग्य योजना !

यासाठीच या चातुर्मासाची सुरवातच आषाढी एकादशीच्या निमित्ताने फार चातुर्याने केली गेली आहे.

हातात टाळ
गळ्यात तुळशीची माळ
डोक्याला बुक्का
आषाढीचा उपवास हुकुमी एक्का.

आषाढी एकादशी,
पूर्ण दिवस उपाशी
विसरूनी जावे पोटाशी..
चित्त मात्र विठ्ठलापाशी…

आधी खाल्लेले, पण न पचलेले अन्न या दिवशी *तो* वापरून घेतो, आतून लागलेलं शेवाळादि सगळं बुळबुळीत वाळून जातं, विनासायास टाकी साफ. काही विशेष न करता, आपोआप आरोग्याचे *पुण्य* जमा होत जाते.

उप वास म्हणजे देवाच्या जवळ रहाणे, असाही एक अर्थ होतो.
अध्यात्मिक भाषेत सांगायचे झाल्यास, *असलेल्या* प्रपंचातील लक्ष काही काळ काढून *नसलेल्या* परमार्थाचा विचार करावा.

साध्या व्यावहारिक भाषेत सांगायचे झाल्यास, उपवास म्हणजे, स्वयंपाकघरातील वेळ कमी करून, देवघरात द्यावा !

एऽऽ, मराठीत सांगितलेलं कळत नाय काय, आता इंग्लिशमदी सांगू ?

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग 9673938021
23.07.2016
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s