Ayurved · Health

#आयुर्कामः

#घरोघरी_आयुर्वेद

#आयुर्कामः

“डॉक्टर; मला संबंध ठेवायला अडचण येते. ‘ती अवस्था’ फार काळ टिकतच नाही.” तो

“कधीपासून त्रास आहे?” मी

“सध्याच. गेले काही महिने फार त्रास जाणवतोय.” तो

“नाही हो डॉक्टर. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच हा प्रॉब्लेम आहे. आता तर खूपच वाढलंय प्रकरण.” ती

पुरुष जननेंद्रियाला उत्तेजना न येणे वा आलेली उत्तेजना पुरेसा काळ न टिकणे याला क्लैब्य किंवा Erectile dysfunction असे म्हणतात. या समस्येमुळे स्वाभाविकपणे शरीरसंबंध ठेवण्यास अडसर निर्माण होतो. भारतात दर वर्षी सुमारे १ कोटी रुग्णांना ही समस्या भेडसावते असे आकडेवारी सांगते.

कारणे:

– भय, चिंता, क्रोध इत्यादी मानसिक भावांनी अस्वस्थ असणे.

– मनोविकारांवरील उपचारासाठी वापरली जाणारी आधुनिक वैद्यकातील औषधे (Antidepressants)

– प्रजनन संस्थेतील अवयवांशी संबंधित शस्त्रक्रिया

– तिखट, आंबट आणि खारट चवीचे आणि उष्ण असणाऱ्या खाद्यपदार्थांचे अत्यधिक सेवन

– अतिप्रमाणात शरीरसंबंध ठेवणे (आयुर्वेदीय ऋतुचर्या यासंबंधी नियमदेखील सांगते.)

– मधुमेहासारख्या रोगाचा दुष्परिणाम

– जन्मजात असलेला दोष

– धूम्रपान, तंबाखू खाणे वा मद्यपान अशी व्यसने

– पॉर्न फिल्म्स अतिरेकी प्रमाणात पाहणे इत्यादि.

उपचार:

– सर्वसाधारणपणे पहिल्याच वेळेस शरीरसंबंध ठेवताना बहुतेक पुरुषांना या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यात चिंता करण्यासारखे काही नसून पुढील पुढील प्रसंगी हा प्रश्न आपोआप सुटतो. हीच परिस्थिती प्रत्येक वेळेस राहिल्यास मात्र उपचार घेणे आवश्यक ठरते.

– बहुतांशी वेळा ही समस्या मानसिक बाबींशी संबंधित असल्याने औषधांसहच समुपदेशन महत्वाचे ठरते.

– मधुमेही रुग्णाला ही समस्या असल्यास मधुमेहावरील उपचारदेखील आयुर्वेदानुसार घेणे अधिक लाभदायी ठरते.

– व्यसनांमुळे ही समस्या उद्भवत असल्यास त्या व्यसनांचा त्याग करण्यातच शहाणपण आणि ‘अर्धे उपचार’ दडलेले आहेत.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लैब्य किंवा Erectile dysfunction याबाबत आयुर्वेदाच्या माध्यमातून उत्तम परिणाम मिळवणे शक्य असले तरी आपल्याला अशी समस्या असल्यास; तातडीने आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्यांना आपला पुरुषी अहंकार कुरवाळत बसायची सवय असते; त्यांच्याकडे पश्चात्ताप करण्यावाचून फार काही शिल्लक राहत नाही हे सत्य कायम लक्षात ठेवावे.

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञ
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s