Health

वांग

आयुर्वेद कोश ~ वांग !!

”चिनॉय सेठ . . चांद पे दाग और हसीन चेहेरे पे वांग शोभा नही देते ”

राजकुमार ने असा कोणताही डायलॉग मारलेला नाही . पण हा डायलॉग मात्र खरा आहे . वांग याने त्रासलेले अनेक चेहेरे आजूबाजूला पाहायला मिळतात . यातील बहुतेकांना या वांगाचा ‘न्यूनगंड ‘ असतो . याच न्यूनगंडातून अनेक क्रीम /जेल / औषधे यांचा भडीमार अंगावर आणि त्वचेवर सुरु असतो . एका दृष्टीने हे पाहायला गेले तर हे साहजिक आहे कारण त्वचा ही जरी शरीरावर असली तरी तिच्याशी निगडीत भाव -भावना -संवेदना या थेट मनाशी जोडलेल्या असतात . त्यामुळे त्वचेचा ‘टोन ‘ बिघडला की मनाचा ‘तोल ‘ हा जातो . तर . . . सौंदर्याला बाधा आणणारे सोरिएसिस सारखे गंभीर . . पिंपल्स सारखे जाहिराती आजार सोडले तर व्यंग / वांग हा आजार महत्वाचा आहे !

आधुनिक विज्ञानानुसार मेलेस्मा ( वांग ) हा आजार मेलेनोसाइटस यांचा अधिक प्रमाणाने होतो . स्त्रियांच्यात अधिक आढळणारा हा आजार घडवण्यात ‘इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन ‘ या संप्रेरकांचा वाटा असतो . तसेच ‘थायरोइड ‘ या आजारात मेलेस्मा वाढल्याचे दिसून येते इत्यादी !!

आयुर्वेदानुसार क्रोध आणि परिश्रम याने प्रकुपित झालेला वायू हा पित्तसह मुखात येउन तोंडावर वेदना रहित , पातळ , काळसर असे डाग उत्पन्न करतो . त्याला ‘वांग ‘ असे म्हणतात .

हा आजार एका दिवसात होत नाही . अनेक काळ वात आणि पित्ताचा प्रकोप करणारे हेतू सेवन करत राहिल्याने हे दोष बिघडतात आणि वांगाची उत्पत्ती होते . मग हे दोष फक्त मुखातच जातात का ?? नाही . . काही वेळा हे दोष संपूर्ण शरीरात पसरून वेदना रहित आणि काळे असे डाग (आयुर्वेदोक्त शब्द मंडल ) उत्पन्न करतात याला ‘निलिका ‘ असे नाव आहे .

आयुर्वेदानुसार यावर करता येण्या सारखे सोपे उपाय :-

१. मंजिष्ठा मधात वाटून त्याचा लेप वांगावर करावा .
२. जायफळाचा लेप लावावा .
३. मसूर दुधात वाटून त्यात तूप मिसळून त्याचा लेप लावावा . आयुर्वेद सांगतो , असा लेप लावल्याने चेहेरा ७ दिवसात कमळाप्रमाणे सुंदर होतो .
४. रक्तचंदन , लोध्र आणि कोष्ठ यांचा लेप लावावा . इत्यादी !!

सदर उपाय हे केवळ लेप स्वरूपाचे आहेत . वास्तविक ‘वांग ‘ यासाठी रक्त मोक्षण , विरेचन इत्यादी पंचकर्मातील उपचार तसेच पित्त शामक , वात शामक , रक्त दुष्टी दूर करणारे , रक्त प्रसादान करणारे असे अभ्यंतर औषध उपचार आवश्यक असतात .

केवळ लेप देण्याचे कारण असे की , वांग घालवणारी क्रीम ही ‘मेलेनीन ‘वर काम करणारी असतात . आपल्या सौंदर्यासाठी चेहेऱ्यावर रासायनिक क्रीम चोपडून त्याच्या साईड इफेक्ट निस्तरण्या साठी अजून एक क्रीम बाळगणे फारसे व्यावहारिक नाही . त्यामुळे हे आयुर्वेदिक लेप फायद्याचे ठरतात .

हे लेप लावत असताना किंवा वांगावर उपचार घेत असताना डोकं आणि मन शांत ठेवणे फार महत्वाचे आहे . . . ‘रागाने ‘ अनेक गोष्टी बिघडतात . . . . वांग हा त्यातलाच एक उपद्रव !!

(टीप – मेलेस्मा = वांग हे दोन्हीतील काही समान लक्षण असल्याने लिहिले आहे . आधुनिक विज्ञान व आयुर्वेद यांच्यात हेतू , संप्राप्ती व चिकित्सा यात मुलभूत फरक आहेत . पण बिगर आयुर्वेदिक लोकांना पांडू म्हंटल की समजत नाही पण ‘एनिमिया ‘ म्हंटले की ओळखीचा शब्द वाटतो . त्यामुळे येथे केलेली तुलना ही विषय स्पष्ट करायला तात्कालिक स्वरुपात केली आहे )

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
आयुर्वेद कोश

(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s