Ayurved · Health

दैनंदिन आयुर्वेद ~पापड

दैनंदिन आयुर्वेद ~ पापड !!

सूर्य व्यवस्थित आणि तब्येतीत तापायला लागला की स्वयंपाकघरात गडबड सुरु होते . पापड ,पापड्या , कुरडया , सांडगे यांची पीठ शिजायला लागतात . पोरा टोरांच्या हातात पापडाच्या गोट्या दिसू लागतात . शाबुदाण्याच्या पापड्या घातल्या असतील तर अर्ध्या ओल्या आणि अर्ध्या वाळलेल्या पापड्या खाऊन २-४ कागद संपतात . अशा या सगळ्या धुडगूसात पापड तयार व्हायचे . सध्या पापड घरी करताना कोणाला पाहीले नाही . कारण विकत गोष्टी बऱ्या पैकी मिळतात तर घरी घोळ कशाला घालायचा ?? अगदीच बरोबर . . . पण घरातील मुलं -मुली कळत्या वयाची झाल्यावर किमान १-२ वर्ष तरी हा घोळ घालावा . . म्हणजे पापड कुठं मिळतो ? दुकानात . .  . पापड कोठे बनतो ? कारखान्यात . . असे होणार नाही . अधिक त्यांना या सगळ्या प्रक्रियेची माहिती होईल आणि तुम्हाला त्यांच्या सोबत अधिक वेळ घालवता येईल …. असो !!

आयुर्वेदानुसार पापडाला ‘ पर्पट ‘ असे नाव आहे . हा पर्पट अरुचीला जिंकणारा उत्तम योद्धा आहे . आयुर्वेदानुसार पापडात –

१. सैंधव .
२. जिरे .
३. हिंग .
४. सज्जिखार.
५. मिरे .

असणे आवश्यक आहे . वरील द्रव्ये ही उत्तम अग्नी दीपक तसेच अरुची नाशक आहेत . आजही आपण जेवणाच्या पंगतीत किंवा घरी जेवायला बसलो आणि पानात पापड असेल तर आधी पापड उचलतो . किंवा हे मंचाव चाऊमीन यायच्या आधी ‘स्टार्टर ‘ म्हणून पापड खायचो . त्यामुळे पापडाचा अरुची , अग्निमांद्य घालवायची भूमिका उत्तम आहे . अर्थात तो वरील पाच जिन्नस युक्त असेल तर !!

हे झाले सर्वसामान्य पापडाचे गुण . . . उडदाचे पापड आणि मुगाचे पापड याचे गुण पुढील लेखात !! शुभ दिवस !!

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
दैनंदिन आयुर्वेद
9175338585

One thought on “दैनंदिन आयुर्वेद ~पापड

  1. Pingback: ayuryogclinic

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s