Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चला आंघोळीला भाग – 8

भस्म स्नान म्हणजेच ज्यांना संध्या करायची आहे, त्यांनी मुख्य आंघोळीनंतर भस्म अंगाला लावायचे आहे.

यज्ञामधे वेगवेगळ्या वनस्पतीच्या लाकडाच्या ओल्या समिधा (एक वीत लांबीचे, करंगळी एवढ्या जाडीचे, ताज्या वनस्पतीचे तुकडे ) हवन म्हणून वापरल्या जातात. यात मुख्यत्वे करून औदुंबर, पिंपळ, रूई, दुर्वा, आघाडा, दर्भ, लव्हाळी, शतावरी, गुळवेल, या वनस्पतींच्या काड्या, दूध, तूप, लाह्या  इ. सात्विक पदार्थ, रेशमी वस्त्र, केळी, तांदुळ, तीळ, नारळ आदि पदार्थ अग्नीच्या मुखात अर्पण केले जातात. विशिष्ट मंत्रातून तयार होणाऱ्या विशिष्ट लहरींद्वारे, विशिष्ट देवता तत्वापर्यंत हे हविर्द्रव्य पोचवले जाते.

ही श्रद्धा आहे. ही द्रव्ये जाळून नष्ट करणे म्हणावे की औषधी भस्म तयार करण्यासाठी  हवन करावे, असे म्हणावे
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,

व्यवहारात भस्म फक्त ब्राह्मण वर्णातील पुरूषच लावतात. तो एक वैदिक विधी आहे. वेदाने काही बंधने स्त्रीयांवर,  घातली आहेत ती त्यांच्या काळानुसार, शरीरशक्तीनुसार, वर्णानुसार पावित्र्य जपण्याच्या क्षमतेनुसार, उच्चारातील शुद्ध अशुद्ध समजण्याच्या कुवतीनुसार सांगितलेली आहेत.
असो. विषयांतर होईल.

भस्माचे गुण लक्षात घेतले तर अंगाला लावलेले भस्म शरीरातील विजातीय    (toxins) शोषून घेण्यास मदत करते.

वैद्यकीय व्यवहार लक्षात घेतल्यास अंगाला आलेली सूज कमी करण्यास……
जलोदरासारख्या आजारात पोटातील वाढलेले पाणी कमी करण्यासाठी मदत करायला घरगुती उपाय म्हणून…..
सांध्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी…….
अंतर्गत अवयवांना आलेली सूज कमी करण्यासाठी. ……
हे भस्मस्नान करू शकतो.
जशी गरज असेल तसे,
पाण्यात अथवा गोमूत्रात अथवा दुधात भस्म कालवून, भगवान धन्वंतरीचे स्मरण करून, अंगाला  लावावे.

साधारणपणे पंधरा वीस मिनीटात हा लेप वाळतो. काढून टाकून आणखी पंधरा मिनीटांनी गरजेनुसार पाण्याची आंघोळ करावी.

हेच भस्म दोन दोन चिमूट खाल्ले तरी आभ्यंतर शुद्धीदेखील होते.
औषध हे काही गोळ्या बाटलीतीलच पाहिजे असे नाही.
आयुर्वेद सांगतो, युक्ती वापरली तर जगातील प्रत्येक वस्तु ही औषधकारणार्थ वापरता येते.
तसेच हे भस्म.
यज्ञात तयार झालेले हे भस्म जर मिळतच नसेल तर काय करावे ?
गावठी, देशी गायीच्या गोवर्‍या जाळून त्याची तयार झालेली विभूती भस्म म्हणून जरूर वापरावी.

लहान मुलांना तर याची चव खूप आवडते.
वारंवार माती खाणार्‍या मुलांसाठी भस्म हे वरदानच आहे.
आता या भस्मात कॅल्शियम किती आणि अन्य घटक किती हे शोधणे, आपले काम नव्हे.

आम्हाला परिणामांशी मतलब.
शरीर सुंदर, सतेज, टवटवीत हवे. आणि व्याधींशिवाय शंभर वर्षे !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग 9673938021
29.04.2016
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s