Ayurved · Health

उपाय सांगा

# आयुर्वेदातुन आरोग्याकडे

☘ उपाय सांगा 🍀

कधीही न भेटलेले वा कुठलेही अष्टविध दशविध परिक्षण न केलेले वा कुठलाही इतिहास मला माहीती नाही असे  लोक facebook what’s up बहुतेक वेळा १ कच प्रश्न विचारतात … मधुमेहासाठी उपाय सांगा, केस गळतीसाठी उपाय सांगा, रक्तदाबासाठी उपाय अश्या असंख्य त्रासासाठी उपाय औषधी विचारतात…
असे उपाय सांगता आले असते तर आज भारतातुन जवळपास सर्वच आजार गायब झाले असते कारण या आजारावर हा उपाय सांगणारयांची कमी आपल्याकडे बिल्कुल नाही.
पण घडते नेमके उलटे.
औषधींचा खप व रूग्णांची संख्या बुलेट train प्रमाणे वेगाने वाढत आहे..
एकच आजार असंख्य कारणातुन निर्माण होऊ शकतात त्यासाठी common उपाय लागु  होत नाही.
आहार निद्रा बह्मचर्य चुकीच्या पध्दतीने नेहमी होत असेल तर वाढलेला रक्तदाब कमी होणारच नाही.. त्यासाठी नेहमीकरिता रक्तदाब नियंत्रित करणारी गोळी घ्यावी लागते.
बाजारातुन नविनच धान्य आणुन वापरले जात असेल तर  रक्तातिल साखर गोळीशिवाय नियंत्रित राहणार नाही. आणि जरी रक्तातील साखर प्रमाणात राहत असेल पण चुकीचा आहार विहार केला जात असेल तर शरीरातील इतर अवयव धातुंना दुष्परिणाम सहन करावे लागतात उपद्रव स्वरूपी आजारांच्या स्वरूपात..
सांधेदुखी वा सर्दी पडसे सारखे त्रास असतिल तर फ्रीजमधील पाण्याचा, पदार्थांचा भाज्यांचा दुधाचा कणकेचा वापर बंद करावाच लागतो नाहीतर रोज रोज pain killers खाऊन किडणीच्या आजारांना निमंत्रण द्यावे लागते..
ही आजार करणारी १-२ उदाहरणे आहेत. असी असंख्य कारणे असतात आजार निर्माण करणारी ती शोधुन बंद करणे व सोबत त्या आजारकारक कारणांमुळे उत्पन्न बदलाच्या विरोधी उपाय केले तर उपशय मिळु शकतो. नाहीतर बहुतेक वेळा उपाय उपयोगी ठरत नाहीत.
खरच कुठलाही नवा वा जुना त्रास कमी करायचा असेल तर सर्व प्रथम त्रासनिर्माण करणारी कारणे टाळा नतंर औषधींची मदत घेऊन आजार असा कमी करा की पुन्हा आजार घडणारी कारणे घडली तरी शरीराने स्वतः च तो दुरूस्त करावा. (स्वभावपरमवादाने) …
त्यासाठी दिनचर्या रूतुचर्या आहार विहार यांचा उपयोग करावा..
Common उपाय बहुतेक वेळा उपयोगी ठरत हेही खरे आहे.
आजाराचे साध्यासाध्यत्व नुसार पुढील प्रमाणे प्रकार असतात.
१.सुखसाध्य– लगेच सुखाने कमी होणारे आजार
२. कष्टसाध्य– लगेच दुरूस्त न होणारे थोडेसे कष्टाने दुरूस्त होणारे आजार
३. याप्य — औषधी सुरू असे पर्यंत बरे वाटते नंतर औषधी बंद केली की पुन्हा त्रास वाढतो असे आजार
४ असाध्य — कुठल्याही औषधींनी वा उपायांनी दुरूस्त न होणारे आजार..
मनाने औषधी खाऊन वा तात्पुरत्या उपायांनी आजार बहुतेक सुखसाध्यतुन कष्टसाध्य, कष्टसाध्यातुन याप्य असाध्यतेकडे जात असतो. काळाचा संस्कार हा त्रासदायकच कधीही…

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
9028562102, 9130497856

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s