Ayurved · Health

आरोग्यासाठी नित्य आयुर्वेद

आरोग्यासाठी नित्य आयुर्वेद
सुखी जीवनासाठी आयुर्वेदाचे नियम
डॉ. पवन लड्डा
मधुमेह व लठ्ठपणा उपचार केंद्र, लातूर
1)   रोज सकाळी लवकर उठावे, दिवसभर उत्साही ताजेतवाने राहण्यासाठी सुर्योदयापुर्वी उठणे आवश्यक आहे. शास्त्रोक्त वचनानुसार सकाळी 4.30 ते 5.00 च्या दरम्यान उठायलाच हवे.
2)  सकाळी उठल्यानंतर शक्य तितक्या लवकर मलमुत्रविसर्जन व्हायला हवे. त्यासाठी गरमचहा, तंबाखु, न्याहरी याची आवश्यकता पडायला नको. सुखकररित्या ह्रा नैसर्गिक वेगाचे उदीरण व्हायला हवे. अन्यथा विषाक्त तत्त्वांचा संचय शरीरात होत राहतो व पुढे यामुळेच शरीरात रोगांचा प्रादुर्भाव होतो.
3)  योगासन, व्यायाम यांचा प्रत्येकाने किमान 30 मि. तरी अभ्यास करायला हवा त्यात विशेष सुर्यनमस्कार, जलद गतीने चालणे, दोरीच्या उड¬ा मारणे, नृत्य करणे, पोहणे इत्यादी समाविष्ट होय. आपले वय, प्रकृती नुसार व्यायाम प्रकाराची निवड करावी. व्यायामामुळे वजन नियंत्रित राहते आणि सृदृढता प्राप्त होते.
4)  ध्यान-धारणा-शारीरिक स्वास्थ्या सोबत मानसिक स्वास्थ पण तितकेच आवश्यक होय. व्यायामा सोबत अध्यात्मिक स्तरावर पोचण्यासाठी ओंकार करणे, ध्यानस्थ राहणे, जीवात्मा-परमात्मा सयोंगासाठी सदैव प्रयत्नरत असणे आवश्यक होय.
5)  रोज सर्वांगास औषधी तेलाने मालिश करणे आरोग्यासाठी हितकर होय. रोज स्नेहन केल्याने त्वचा मृदु राहते. प्रौढ वयात वाताचे विकार होत नाही. दीर्घायुष्य प्राप्त होते.
6)   दररोज तुमच्या दिवसाचा प्रारंभ मधुयुक्त जलाने करणे, 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मध टाकून घेतल्याने शरीरात साठलेल्या आमाचे विघटन होते.
7)  पचन तंत्राना व्यवस्थित रहावी, दररोज पोट व्यवस्थित साफ रहावे म्हणून योग्य मात्रेत स्वच्छ-शुध्द पाणी पिणे आवश्यक होय. पाण्यामुळे सुध्दा विषाक्त तत्व शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
8)   रोजचे दैनंदिन जीवन जगताना निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा प्रयत्न करा. निसर्गाची जोपासना करा, पर्यावरणाची रक्षा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. निसर्गाच्या जवळ गेल्याने आपला ताण-तणाव कमी होतो, आपण आपल्या अडचणी-चिंता विसरून जोमाने कामाला लागतो.
9)  सौंदर्याची जोपासना करण्यासाठी आपला स्किन पॅक घरी बनवा. कित्येक आयुर्वेदिक औषधी आपल्या घरातच उपलब्ध आहे, मध, गुलाबजल, काकडी रस, बदामाचे गट, दही, धणे, हळद, जायफळ असे अनेक पदार्थ आपण त्वचेवर आपल्या स्किन टाईप नुसार वापरावीत.
10) रोजच्या जिवनात वेळेचे गणित पाळणे अत्यावश्यक भाग आहे. कुठली कामे  अती महत्त्वाची कुठली कमी किंवा कुठली कामे कधी करावी यांची योग्य यादी बनवा, वेळापत्रक तयार करा, त्यानुसार आपल्या कामाची पध्दत ठेवा, जेणेकरून धावपळ होऊन निरर्थक भावनिक, मानसिक गोंधळ निर्माण होणार नाही.
11) रोजच्या आपल्या आहारात आयुर्वेदिक औषधी गुण असणा­या कंद-भाज्या (मसाले) म्हणजे अद्रक, हळद, सुंठ पावडर, काळे मिरे पावडर, जिरे पावडर, धणे पावडर, धणे पुड, दाणा मेथी, कोथींबीर, मेथी, कारले, शेवगा, पडवळ, चंदन बटवा, हिरवे मुंग यांचा वापर अधिक करावा. यामुळे रक्तातील शर्करा, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते तसेच पचन तंत्रणा सुरळीत चालत राहते.
12) ताजी ऋतनुसार उपलब्ध असणारी सेंद्रिय फळे आपल्या खाण्यात नियमित असावी. फळांच्या सेवनाने डोळे, त्वचा आणि केस यांचे विकार उद्भवत नाही तसेच दात (नैसर्गिकरित्या) स्वच्छ होतात. प्रत्येक फळाचा आकार रगं वेगवेगळा असतो, शिवाय फळे ही गडद रंगाची असतात म्हणजे त्याच्यात अधिक मात्रेत व भिन्न भिन्न पौष्टीक द्रव्ये लपलेली असतात.
13) निद्रा ही आरोग्याच्या त्रयोस्तंभापैकी एक होय. रोज 5 ते 8 तास रात्रीची झोप मिळणे अत्यावश्यक होय. रात्री शांत झोप येण्यासाठी तळपायांना एरंड तेल किंवा शतधौत घृत काशाच्या वाटीने लावावे. चंदनबला तेलाने सर्वांग स्नेहन करावे. झोपतांना एक ग्लास गरम दुध घ्यावे, तसेच दीर्घ·ासन करीत आराध्य दैवतेचे स्मरण करीत डोळे मिटून घ्यावे.
14) आपल्या प्रकृती नुसार, ऋतुमानानुसार आयुर्वेदिय पंचकर्म-वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण यांचा उपयोग तज्ञांच्या परामर्शानुसार करीत रहावा. त्यामुळे आजार असल्यास नियंत्रणात येतील आणि निरोगी असल्यास हेच आरोग्य जिवनभर अबाधित राहून दिर्घायुष्य लाभेल.
द्वारा
डॉ.  पवन लड्डा
आयुर्वेदाचार्य
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
लड्डा स्किन अॅण्ड हेल्थ केअर सेटंर
गर्भसंस्कार केंद्र, लातूर.
घ्ण्.ददृ. (02382) 221364 ड़ड्ढथ्थ् 09326511681
ाथ्र्ठ्ठत्थ्:- थ्ठ्ठड्डड्डठ्ठद्रध्दऋढ़थ्र्ठ्ठत्थ्.ड़दृथ्र्

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s