Uncategorized

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

चला आंघोळीला  भाग  – 6

स्नानानंतर येणारी प्रसन्नता अनुभवण्यासाठी मन, आत्मा इंद्रिये वर्तमानात हवीत. आणि हा आनंद मिळाला की अंतर्बाह्य शुद्धि  निश्चित.

H2O  की तीर्थ ?
तर्क आणि अनुभूती या दंद्वातून बाहेर पडलो की काही प्रश्नांची ऊत्तर मिळतील.

काही प्रश्न सोडवले की सुटतात, तर काही सोडून दिले की सुटतात, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात.

दक्ष स्मृतीमधे आंघोळ तीन वेळा करावी असं म्हटलेलं आहे.
स्नानाचे दृश्य फळ म्हणजे शरीर शुद्धि आणि अदृश्य फळ म्हणजे, सुस्नात व्यक्तीच्याजवळ भूतप्रेतादि वाईट दुष्ट शक्ती येत नाहीत. आणि पुण्याची प्राप्ती होते.
😇😇😇😇😇😇😇😇
😳😳😳😳😳😳😳😳
😡😡😡😡😡😡😡😡
😷😷😷😷😷😷😷😷

असे रागावू नका ना राव !
आस्तिक आयुर्वेद, मानतो या गोष्टी !
आणि गणिताचे योग्य उत्तर मिळेपर्यंत  आपण ” X ” गृहित धरतोच ना.
(ऊत्तर मिळालं की, जा या “X” ला विसरून, वाटलं तर ! )

तर ….
चला, थोड्यावेळपुरतं आपण यांना व्हायरस, बॅक्टेरिया समजू.

तर
विश्वामित्र स्मृती  1 / 28 मधे सांगते,
सुस्नानाने रूप, तेज, बल, शौच ( शुद्धी /पवित्रता), आयुष्य, आरोग्य, निर्लोभता ( अलीप्तता, मनाचे स्थैर्य), तपश्चर्या, आणि मेधा (बुद्धी )यांची प्राप्ती होते  आणि वाईट स्वप्नांचा नाश होतो.

झोपण्यापूर्वी परत आंघोळ केली की शांत गाढ झोप लागते. (पुण्या मुंबईत एवढं पाणी असलं,  तर करून बघा.)

यथाकालं यथादेशं
ज्ञात्वा ज्ञाता विचक्षणः।
स्नानाधारणं इति…
देश, काल, शरीराची स्थिती, कांती, रोग यांचा विचार करून स्नान करावे.

डोक्यावरून पुर्ण स्नान सर्वात श्रेष्ठ,
निदान खांद्याखाली तरी करावे,
नाहीच जमले तर कटीस्नान,
तेही नाही तर गुडघेस्नान तरी अवश्य करावे.
अगदीच आजारी, झोपूनच आहे, त्याला ओल्या फडक्याने पुसुन तरी काढावे. याला स्मृतीग्रंथांनी कपील स्नान म्हटलेले आहे.

काहीही करा, पण एकदा तरी आंघोळ नीट मन लावून करा हो.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ  सिंधुदुर्ग 9673938021
27.04.2016.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s