Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

चला आंघोळीला भाग –  5

दिवसाची सर्वाधिक सुंदर आनंददायी वेळ कोणती ?
असे मला विचारले तर मी ऊत्तर देईन,
“आंघोळीनंतरची 15 मिनीटे.”

(प्रत्येकाला असंच वाटेल असंही नाही. पण असा सार्वत्रिक  अनुभव वाटतो. )

दिवसातून तीन वेळा मनसोक्त आंघोळ आणि एक वेळा यथेष्ट, यथेच्छ भरपेट भोजन !

निरोगी रहायला यापेक्षा आणखी काही नको असे मला वाटते.

शरीराला असलेल्या कान, नाक, डोळे, मलमूत्र घाम इ. नवद्वारातून काही ना काही मलनिर्मिती होतच असते. रात्रीच्यावेळी जरा जास्तच होते.

या मळांना लवकरात लवकर शरीराबाहेर काढावे. शरीरदेखील तश्या सूचना आपल्याला करीत असते.

म्हणून पहिली आंघोळ सूर्योदयापूर्वी करावी.

माझ्या आजोबांना मी आंघोळ करताना पाहिले आहे.
नदीवर जायचे, वाहात्या पाण्यात  एकदोन डुबक्या मारायचे. नदीतील तळाची माती काढून खसखसून अंगाला चोळायचे. पुनः दोन चार डुबक्या. झाली आंघोळ.

महत्वाचे काय वाटते,
ते नेसलेल्या धोतराच्या ओल्या सोग्यानेच अंग पुसायचे. अंग थोडे ओले ठेवायचे. सुकलेले धोतर नेसून ओले धोतर स्वतःच धुवायचे.

जिथे हवा कोरडी असते, तिथे लगेच कोरड्या टॉवेल वा पंच्याने अंग पुसू नये. हा राहिलेला थोडा ओलेपणा त्वचेला टवटवीत ठेवतो. (फार काही वातप्रकोप वगैरे होत नाही हं. वरन ऊन होतं सणसणीत ) म्हणून म्हणतो, व्यवहार जास्त महत्वाचा !

घराबाहेर जी आंघोळ केली जाते त्याचेही काही नियम वैदिक ग्रंथात, स्मृती, पुराणांमधे वर्णन केले आहेत.

तलावाचे ऋण म्हणून आंघोळ झाल्यावर चार मूठ गाळमाती बाहेर काढून ठेवावी.

नदी तलाव आदि सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करताना तेल लावू नये, असंही दक्षस्मृती मधे म्हटलेलं आहे.

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी स्नान करायचे असेल तर अगोदर पाय हात डोके धुवून नंतरच नदी अथवा तलावात उतरावे, (आज जलतरण तलावात  असाच नियम केला जातो.)
पाण्याचा अंदाज नसलेल्या अनोळखी ठिकाणी स्नान करू नये. असेही स्मृतीग्रंथात सांगितले आहे.

हे नियम का केले असावेत ?

नदी, तलाव याठिकाणी केली जाणारी आपली आंघोळ, इतरांचे सामाजिक आरोग्य बिघडवणार नाही, याची काळजी घ्यायला सांगणारे, आमचे पूर्वज किती बुद्धीमान  होते,  हे आजच्या पिढीच्या लक्षात आले तरी आज पुरे !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ.सिंधुदुर्ग  9673938021
26.04.2016
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s