Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

चला आंघोळीला भाग –  4

आंघोळ केल्यानंतर एकदम मस्त वाटतं ना. !

का ? एवढं फ्रेश का वाटतं ?

“धुतल्यामुळे ”
मन आत्मा आणि शरीर.

मळ निघून जातो यांच्यावरचा !
त्यासाठीच संकल्प महत्वाचा. आणि
श्रद्धा देखील !

नाहीतर गंगोदक आणि नलोदक यात फरक काय म्हणा !

रासायनिक आणि वैज्ञानिक पृथक्करण एकच असेल,
H2O.

पण, दोघांच्या संकल्पाचे परिणाम वेगळे असतात.
एक तीर्थ बनते तर दुसरे साधे पाणी.

मन आणि आत्मा या विज्ञानाच्या पलीकडील गोष्टी आहेत. तर्क, अनुमान आणि आप्तोपदेशाने जाणून घ्यायच्या. ( आप्त उपदेश म्हणजे, वयाने, ज्ञानाने, अनुभवाने संपन्न.  मग ती व्यक्ती  असेल किंवा ग्रंथ ! )
स्वतः अनुभवायच्या गोष्टी .
या गोष्टी कदाचित सिद्ध करता येणार नाहीत. प्रत्येकाचे अनुभव पण वेगळे असू शकतात.

पंढरपूरचे गोदातीर्थ असो वा ऊज्जैनचे गंगातीर्थ. तेथील दलदल, घाण, दुर्गंध एकच असेल. पण याच्या पलीकडे जाऊन लाखो भक्तगण तिथेच आंघोळीला  (कि स्नानाला) का जातात ?

पवित्रता आणि शुद्धता या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
आंघोळीला गंगेचे पाणी शुद्ध नसेलही, पण पवित्र असते. ही भावना, शुद्धतेच्या सर्व कसोट्या  पार करून जाते.
म्हणून तर
मोदीजी आणि दिग्गीजी
दोघेही उज्जैनच्या  कुंभमेळ्यात न्हाऊन आलेच ना !

आणि आम्ही उगीचच शास्त्रीय परिमाण वापरून काथ्याकूट करीत बसणार !

तीर्थक्षेत्री घडणारी गंगोदकाची आंघोळ आणि ऊकळून पाणी शुद्ध करून घेतलेल्या नलोदकाची आंघोळ यात परिणामात मात्र फरक पडताना दिसतो.
तो आपण पहावा. अभ्यासावा.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021
25.04.2016
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

One thought on “आजची आरोग्यटीप

  1. Pingback: ayuryogclinic

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s