Ayurved · Health

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

चला आंघोळीला  – 2
आपण कोणत्या पाण्याने आंघोळ करतोय, ते पाणी आपणाला सोसवणारे आहे का ? याचा विचार जसा आपण स्वतः चांगला करू शकतो, तसाच एक ऊत्तम जाणकार वैद्य देखील करू शकतो.
त्यासाठी आपली प्रकृती कोणत्या पद्धतीची आहे, हे वैद्याकडून एकदा समोरासमोर बसून, समजावून घेणे आवश्यक आहे.

ज्याची प्रकृती वाताची  आणि त्याला होणारे त्रास वाताचे, पित्ताचे, वा कफाचे असतील तर, त्याला आंघोळ कोणत्या पाण्याने करावी ? याचा ऊत्तम सल्ला जाणकार वैद्यच देऊ शकेल.

रोगानुसार विशेष आंघोळ  –
ज्यांना त्वचेचे आजार आहेत त्यांनी पाण्यात कडूनिंबाचा पाला घालावा.
ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी पाण्यात कापूर घालावा.
ज्यांना कफाचे आजार असतील त्यांनी पाण्यात तुळस घालावी.

काळानुसार आंघोळ –
थंडीच्या काळात गरम पाणी, सध्या सुरू असलेल्या उष्णतेमधे पाणी गार असावे. हा सामान्य नियम आहे.

साधारणपणे होळी झाली की, गार पाणी वापरायला सुरवात करावे. पावसाळ्यात हिवाळ्यात पाणी कोमट किंवा गरम घ्यावे.

वयानुसार आंघोळ –
लहानपणी तांब्याच्या किंवा पितळेच्या तपेल्यात पाणी सूर्यप्रकाशात तापवून केलेली            ( आजच्या काळानुसार vit d युक्त ) आंघोळ कुणाला आठवतेय का ?

पोटभर जेवण्याच्या वयात पथ्यामुळे, असून देखील लिमिटेड खाण्याचा हा काळ !
फुकट मिळालं तरी,  वाचायला वेळ नाही म्हणून लिमिटेड मेसेज टाका,  म्हणून अॅडमिनला सांगावे लागणारा हा काळ !
पाणी जेवढे जास्त तेवढी स्वच्छता जास्त, हे माहित असूनदेखील, पाणी टंचाई मुळे बादलीभर पाण्यात बुचकळून, आंघोळ  उरकावी लागणारा हा काळ !

आता आपण किती पाण्यात स्वतःला धुवून “तृप्त” व्हावे,
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021
23.04.2016
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s