Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹
आंघोळीच्या आधी काय करावे भाग 12

मेहनत करा. मेह नत होईल.
मेह म्हणजे प्रमेह,याचे वीस प्रकार केलेले आहेत. आजही हे प्रकार बघावयास मिळतात.

या सगळ्यात सुंदर व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार.

मनापासून केलेली, घाम गाळणारी कष्टाची कामे देखील व्यायामसदृश फल देतात.

नाकाने सुरू असणारा श्वास जेव्हा तोंडाने घ्यावासा वाटतो,  तेव्हा आपली व्यायाम थांबवण्याची वेळ झाली असे समजावे.
आत्ता 40 -50 वर्षापूर्वी हातरहाट, पायरहाटाने पाणी काढणे, ओणवे राहून झाडांना पाणी लावणे, उकिडवे बसून सारवणे, जात्यावर दळणे, जमिन खणणे, इ. श्रमाची कामे असल्यामुळे मधुमेहासारखे आजार वाढत नव्हते. मेह नष्ट होण्यासाठी “मेह-नत” करावीच लागेल.

त्याला पर्याय नाही.

कामचलावू पण आयुष्यभर घ्याव्या लागणार्‍या गोळ्या, इंजेक्शन घेऊन कधीही चरबी हटतच नाही.
उपाय ?
घाम गळेपर्यंत काम.

मग प्रत्यक्ष ईश्वर देखील तुमचे काम हलके करण्यासाठी मदत करायला हजर असतो.

न ऋते श्रान्तस्य सख्ख्याय देवः। असं वचन वेदांमधे आहे, चारशे वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी पण सांगितले, प्रयत्नांती परमेश्वर.
आणि आधुनिक काळातील संत बहिणाबाई म्हणतात,
टाया पिटीयासी देव भेटत नाही.
ज्याले हाताले घट्टे त्याले देव भेटे

एकुण काय व्यायामाला किंवा व्यायामसदृश कामातून सुटका नाहीच.

पूर्वीसारखी कामेच आता शिल्लक नाहीत, म्हणून गप्प बसून चालेल का ?
बदलत्या काळानुसार, आपल्याला साजेसा व्यायाम किंवा व्यायामसदृश काम आपणच शोधून काढायचे. ते काम करायची लाज वाटता नये
चालणे हा मात्र आजही व्यायाम  नाही हो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s