Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप
आंघोळीच्या पूर्वी काय करावे ? भाग 11
लोळणे हा अर्धसुंदर व्यायामप्रकार आहे.
मग पूर्ण सुंदर काय आहे?
सूर्य नमस्कार
साष्टांग नमस्कार
अष्ट अंगांना कामाला लावणारा व्यायाम.
दोन्ही हात, दोन्हीही पाय, मस्तक नाक, छाती, ढोपर आणि मनासह आत्मा.
शरीराला पीळदार बनवून वाढते शरीरबल !
समंत्र असला की आत्मशक्ती विकास
आणि
मनापासून केला की मनोविकास.
….म्हणून सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर आणि पूर्ण व्यायाम.
दिल्ली च्या विमानतळावर या सूर्यनमस्काराची मस्त प्रतिकृती दिमाखात ऊभी आहे.
जणुकाही प्रत्येकाला सांगतेय, भारताचे हे वैभव आहे. सूर्य हा आमच्या आरोग्याचा स्वामी आहे. जगात कुठेही जा. या स्वामीला, सूर्याला कधीही विसरू नका. तो आहे, म्हणून आपण आहोत. त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला लाज कसली ?
सगुण रूपात दिसणारे दोन देव
एक सूर्यनारायण
आणि
दुसरे अग्नि नारायण !
दोन्ही तेज महाभूतप्रधान !
अग्नि म्हणजेच “काय ”
या अग्निचे रक्षण करणे, म्हणजेच कायचिकित्सा होय.
ज्यांच्या नावातच, अग्नि आहे, आरोग्याचे तेज तिथे वास करी
जपान जर्मनी रशिया यासारख्या देशात हा व्यायाम सन सॅल्युटेशन या नावाने भलताच लोकप्रिय झालेला आहे.
त्याच्या देशात सूर्य सहसा दिसत नाही. चुकून दिसलाच तर त्यांना एवढा आनंद होतो, की ते एकमेकांना ” व्हाॅट अ प्लेझंट सरप्राइज, गुडमाॅर्निंग” अशा शुभेच्छा देतात.
पण आमच्या देशात रोज सूर्य उगवतो, दिसतो, मावळतो,
मग भारतात “गुडमाॅर्निंग” वेगळं म्हणण्याची आवश्यकताच नाही.
काहीजण म्हणतील,
“जरा आमचं कौतुक म्हणून नाही ते कधी ! पण आम्ही आपले नेहेमीच “गुडमाॅर्निंग” म्हणणार.”
म्हणा !
या शुभेच्छांचा संबंध सुर्याशी असतो, एवढे लक्षात ठेवले तरी बास्स !
वैद्य सुविनय दामले. कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s