Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप
आंघोळीपूर्वी काय करावे ? भाग 10
चालण्यापेक्षा लोळणे चांगले !
लोळणे म्हणजे लोटांगण आणि गादीवर किंवा बिछान्यावर नव्हे तर जमिनीवर.
नेहेमी झोपतो तसे झोपून हात डोक्यावर नमस्कार अवस्थेत किंवा हात पोटावर घेऊन शरीराला गुंडाळत गुंडाळत गोलगोल फिरायचे, म्हणजे लोटांगण !
(कोकणात काही देवालयात नवस म्हणून लोटांगण घातली जातात.)
अशा लोटांगणाने मल प्रवृत्ती देखील साफ रहाते.
या लोटांगणासनाचा ऊल्लेख वाचनात आलेला नाही, पण अनुभव खूपच छान आहेत.
अगदी लहान मुले जेव्हा सरपटत पुढे जाऊ लागतात, तेव्हा त्यांच्या पोटाचा आकार कमी व्हायला लागतो. हे आपण व्यवहारात पाहातोच.
याचा एक फायदा म्हणजे
आबालवृद्ध हे आसन करू शकतात.
घरातल्या घरातदेखील हे आसन करू शकतो.
कोणत्याही सांध्यांवर अतिरिक्त ताण येत नाही.
सर्व शरीराचे वजन विभागून सर्व शरीरातील प्रत्येक अवयवांवर दाब पडतो आणि तेथील वात किंवा चरबी हलायला मदतच होईल.
पोट बर्यापैकी चेपले जाते. पोटाच्या साईडची चरबी कमी होते.
लोळणे, लोटांगण हा विशेषतः मधल्या धडाची जाडी कमी करणारा व्यायाम म्हणून उत्तम काम करतो.
लोटांगण घातल्याने पायाकडील रक्तपुरवठा मेंदू आणि ह्रदयाच्या दिशेने सुरू होतो.
करून बघा एक प्रयोग- कडा नसलेल्या ग्लासामधे चमचाभर तांदूळ घालून ग्लास आडवे करून जमिनीवर लोटांगणाप्रमाणे हळुवार गोल फिरवत न्या. तळातील तांदूळ आपोआप आडव्या ग्लासाच्या बाहेर पडतात.
जे जे ब्रह्मांडी ते ते पिंडी या न्यायाने शरीरात काय होईल याचे अनुमान करा.
सुरवातीला पोटात ढवळून निघते. काहीवेळा ऊलटी होते देखील !
पोटातील दोष हलायला लागल्याचे हेच लक्षण आहे !
अर्थात पोटात असलेल्या वायुमुळे देखील असे ढवळते.
ढवळाढवळ सुरू झाली, उत्क्लेश सुरू झाला, दोषांना बाहेर पडण्यासाठी गती आणि दिशा मिळाली.
किती वेळा आणि किती वेळ लोळावे ?
नियम तोच , कपाळपट्टीवर, मिशीच्या ठिकाणी, काखेत घाम आला कि थांबावे.
सर्वसाधारण चार पाच वेळा ऊलट सुलट फिरावे. नंतर क्रमशः दरदिवशी एक दोन वेळा वाढवावे.
पोटातील गॅस वगैरे कमी होत आले की, सर्वांगसुंदर सुर्यनमस्कारही घालावेत.
हे लोळणे स्वकेंद्रानुवर्ती असल्याने विश्वाच्या त्याच पद्धतीने चाललेल्या आवर्तनात आपणाला आपण जोडून घेत असतो.
चला, सुरवात तर झाली, दोष हलू लागले. हे ही नसे थोडके !
वैद्य सुविनय दामले.कुडाळ. सिंधुदुर्ग
9673938021

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s