Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

आजची आरोग्यटीप
आंघोळीपूर्वी काय करावे -भाग 9
व्यवहारात वजन आणि जाडी वेगवेगळी बघायला मिळते.
काहीजण अंगलटीनेच जाड दिसतात, पण प्रत्यक्षात तेवढं वजन दिसत नाही. (बडा घर पोकळ वासा)
काही जणांची जाडी दिसत नाही, पण वजन योग्य भरलेले असते. (काटकपणा / ताकद असते.)
आधी हे समजून घेऊया की,
उंची वजन तक्ते अभारतीय आहेत. त्याची मानके पाश्चात्य आहेत. बीएमआय ही संकल्पना पण पाश्चात्य जगात कोणी कुरवाळत बसत नाहीत.
अशावेळी काय करावे ?
वजन वेगळं जाडी वेगळी.
यांच्यासाठीचा व्यायामही वेगळा.
फुग्यात हवा भरली, तर फुग्याचा आकार वाढेल, पण वजन वाढणार नाही.
पण फुग्यात पाणी भरले तर आकारही वाढेल आणि वजनही !
शरीरात वात वाढला तर केवळ जाडी वाढेल, पण वजन नाही, ताकदही नाही.
आणि शरीरात मेद वाढला तर….
जाडीही वाढेल आणि वजनसुद्धा.
वातवृद्धीची लक्षणे आणि मेदोवृद्धीची लक्षणे ग्रंथात दिली आहेत. व्यवहारात ती तशीच दिसतात.( सामान्यांना हे ग्रंथ समजतील असे नाहीत)
या दोघांसाठीचा व्यायाम वेगळा असेल.
ज्यांची केवळ जाडी वाढली आहे त्यांनी चालू नये, चालण्याचा प्रयत्न (व्यायाम म्हणून ) केला तरी यांचे सांधे दुखतात, सुजतात, विशेषतः गुडघे, पोटरी, पावले, बोटे, चवडा, घोटा, टाच दुखते. यांना रक्तदाबावरील गोळी विनाकारण घ्यायची सवय (/ हौसपण ) असते, जेवणातील तेल, कोलेस्टरॉल च्या भीतीने कमी केलेले असते आणि धातुंच्या झिजण्यामुळे वात वाढलेला आढळतो.
ज्यांची केवळ जाडी वाढली आहे त्यांनी चालू नये, कारण तीव्र वातप्रकोप !
आणि वजन जास्त वाटतंय तरी, त्यांनी चालू नये,
कारण ?
खालच्या गुडघ्यांवर वर वाढलेल्या वजनाचा अधिक दाब. विनाकारणच !
यासाठी त्यांनी “चालणे” हा तथाकथीत व्यायाम प्रकार तात्काळ बंद करावा. ( आयुर्वेदावर % विश्वास असेल तर, रक्तदाबावरील, कोलेस्टरॉल वरील औषधे सुद्धा ! )
आणि काय करावे ?
अंगाला (तेल लावणारे कोणी नसेल तर) स्वतःचे स्वतः तेल लावावे. आणि मस्त लोळावे……..
(लोळाना, उद्यापर्यंत !!!!)
वैद्य सुविनय दामले.कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s