Ayurved · Health

व्यायाम

व्यायाम…..भाग 3…जिम आणि आहारविहार
जिम म्हटले की काय डोळ्यासमोर येते सांगा पाहू?
अहो अर्थातच एक सुंदरशी आलिशान खोली. सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या मशिन्स.पिळदार शरीरयष्टी असणारे बॉडीबिल्डर व्यायाम करत आहेत.काहीजणांनी कानांना इअर फोन जोडलाय गाणी ऐकण्यासाठी.हेच ते सध्याच्या युगातील जिमचे स्वरूप.आपण त्या जिमच्या पत्त्यावर आपली छानसी दुचाकी घेऊन टपकतो.जिमच्या दिशेने आपली पावले वळायला लागतात.त्यावेळी डोळ्यासमोर आदर्श असतो तो सिक्स पॅक सेलिब्रिटी चा
जिममध्ये प्रवेश करताच क्षणी सुखद हवेचा गारवा(A.C) अंगावर पडल्याने मन अधिकच प्रफुल्लीत होते.मग मॅनेजर तुमचं स्वागत करतो वेगवेगळी व्यायामाची पॅकेजेस दाखवतो आणि वर डिस्काउंट पण देतो वर हे पण सांगतो साहेब खास तुमच्यासाठी हे पॅकेज बनवले आहे घेतले तर भेटवस्तू पण मिळेल.
वरील प्रसंगावरून कशाची आठवण येते हो तुम्हास ?? मग तुमच्यापैकी कोणीतरी म्हणेल मॉलमध्ये गेल्यासारखं वाटत बुवा
थोडी वर्षे माग जाऊ.एक वाचलेला किस्सा आठवला तो पण ‘लोकमान्यटिळकांचा.’ज्यावेळी ते तरुण होते तेव्हा ते कृश दिसायचे पण स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याचा उत्साह पुरेपूर संचारलेला.आत्मनिरिक्षण केल्यावर लक्षात आले ही शरीरयष्टी स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीने काय कामाची ? त्यामुळे ही गोष्ट मनावर घेऊन व्यायामास सुरुवात केली.
मनात प्रश्न उमजेल कुठल्या जिममध्ये गेले असतील बुवा लोकमान्य ?
अहो घरातच होती त्यांची जिम. आणि दण्डबैठका मारणे,सूर्यनमस्कार,जोर मारणे हे त्यांचे व्यायाम.यामुळेच त्यांचे शरीर घडले.
मग कोणितरी म्हणेल तो पूर्वीचा काळ होता हो. यावर एकच म्हणेन अजूनदेखील आपल्या देशात वरील व्यायाम केले जातात.त्यातील ‘सूर्यनमस्कार’ हा तर एक ‘सर्वांगसुंदर व्यायाम’ होय.नावाप्रमाणे सर्व अंग सुंदर बनविणारा एक आणि परिपूर्ण व्यायाम करावा की वेगवेगळ्या अंगांचे वेगवेगळे व्यायाम जिममध्ये जाऊन करावे हे आपणच ठरवावे.
आहारविषयक
व्यायाम केल्यावर भूक लागते मग काय खावे बुवा जेणेकरून शरीर सुडौल बनेल ?? तर असे सांगावैसे वाटते जिम इनस्रक्टरच्या अपुऱ्या ज्ञानातून आलेले मटण ,अंडी व प्रोटीन पॉवडर न खाता त्यासंबंधी जवळील आयुर्वेद तज्ञाकडून मार्गदर्शन घ्यावे मगच योग्य तो आहार घ्यावा.
प्रोटीन पावडर नावाचा प्रकार हा शरीरास घातक असून तुमच्याकडून त्यासाठी हजारांनी पैसे घेतले जातात तेसुद्धा विनाकारण.
जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते सहज सुलभ आणि दररोज करता येण्याजोगा व्यायाम हाच तुम्हाला चिरंतन बळकट शरीर देऊ शकतो ….. व्यायामाने तुमचे आयुष्य वाढो हीच शुभकामना धन्यवाद.
Shree vishvadatta ayurved kudal maharashtra
Contact 8411849757

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s