Ayurved · Health

व्यायाम आयुर्वेदाच्या चष्म्यातून

व्यायाम आयुर्वेदाच्या चष्म्यातून

आठवतो तो पूर्वीचा काळ. शेतात दिवसभर कष्ट करणारी माणस. अन त्यांची पीळदार शरीरयष्टी. वाटेल ते काम करण्याची ताकद असायची त्यांची तेव्हा.
काळ बदलला तसा माणसाच्या शरीरात पण फरक पडत गेला.पीळदार शरीरे नाहीशी होत गेली आणि ढेरपोटी बेढब शरीरांची संख्या मात्र वाढली.का बरे झाले असेल असे ???
याच उत्तर एकच ते म्हणजे ‘दैनंदिन व्यायामाचा अभाव.’ तिकडे महानगरात तर ज्याप्रमाणे आठ्वड्यातून एकदा आऊटिंगला जातो त्याप्रमाणे आठवड्यातून एकदा व्यायाम करायचे फॅड वाढतच चाललंय.
यातून एकच प्रश्न विचारावासा वाटतो आठवडयातून एकदाच जेवण केले तर चालेल का???
अर्थात आपल्यापैकी बऱ्याच जणांचे उत्तर नाही असेल कारण भूक रोज लागते म्हणून रोज जेवतो . त्याचप्रमाणे ईश्वराने दिलेलं शरीररूपी सौंदर्याचं लेण टिकवायचं असेल आणि डॉक्टरांकडे फेऱ्या कमी करावयाच्या असतील तर एकच उपाय तो म्हणजे ‘दैनंदिन व्यायाम.’
चला तर मग आयुर्वेद काय म्हणतोय व्यायामाविषयी हे जाणून घेउ.
व्यायाम म्हणजे काय ?
शरीराची जी हालचाल शरीरास आणि मनास प्रिय असून शरीरास स्थिरता देणे व बळ वाढवणे यासाठी केली जाते ती म्हणजे व्यायाम होय.

व्यायाम किती करावा ?
अर्धशकत्या व्यायाम करावा म्हणजेच व्यायाम करताना शरीरास घाम सुटायला लागला आणि दम लागायला कि व्यायाम थांबवावा अन्यथा शरीराची हानी होते.

व्यायामाने काय फायदे होतात ?
आपले शरीरात हलकेपणा येतो.
काम करण्याचे सामर्थ्य वाढते.
भूक वाढते.
शरीर आखीव रेखीव आणि पिळदार बनते.

कोणी व कधी करावा व्यायाम ?
स्निग्ध आहार घेणाऱ्या व बळकट व्यक्तीने शितकाळात म्हणजेच हेमंत,शिशीर व वसंत ऋतूत व्यायाम करावा.इतर ऋतूत अल्प प्रमाणात व्यायाम करावा.

व्यायाम कोणी करू नये ?
१६ वर्षाच्या आतील मुले,वृद्ध व्यक्ती,व वातपित्ताचे विकार असणाऱ्या व्यक्ती( दमा, खोकला,रक्तपित्त,जेवल्यानंतर ,शरीराने बारीक व्यक्ती) यांनी व्यायाम टाळावा.

अति व्यायामाने उत्पन्न होणारे विकार……..
तहान लागणे,शरीराचा ऱ्हास होणे,थकवा येणे,दमा सुरु होणे,ताप येणे,उलट्या होणे इत्यादी….
वरील लेखाचा विचार करून आपण योग्य तो बदल शरीरात घडवून आणालं अशी आशा करतो आणि निरोप घेतो धन्यवाद…. Vaidya dattaprasad prabhu,shree vishvadatta ayurved.,kudal sindhudurg,maharastra
Contact 8411849757,9029474927

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s