Ayurved

श्रेष्ठ रसायन दुध व तुप

श्रेष्ठ रसायन दुध व तुप

क्षीरघृताभ्यासो रसायनानाम् | च.सु.२५

नेहमी खाण्यात तुपाचा व पानार्थ दुधाचा वापर हा रसायन लाभ देणारया पदार्थांत शास्रकारांनी श्रेष्ठ सांगितला आहे. दुध व तुप गाईचे असेल तर श्रेष्ठच.

रसायन पदार्थ सेवन केले असता पुढील लाभ होतात.

दीर्घमायुः स्मृर्ति मेधामारोग्यं तरूणं वयः|
प्रभावर्णस्वरौदार्य देहेन्द्रियबलोदयम्|
वा.सु. ३९/१

दीर्घ आयुष्य, स्मरणशक्ती, धारणशक्ती, आरोग्य, तरूण वय, उत्तम तेज, चांगला वर्ण,मधुर स्वर, वाणीची सिध्दी, सौंदर्य प्राप्त होते. सोबतच शरीरातील सातही धातु उत्तम तयार होत असल्याने देहाची व ५ ही इंद्रियांची शक्ती वाढते.
शरीराच्या योग्य निर्मितीसाठी दुध व तुपाचे सेवन करणे अत्यावश्यक आहे. दुध व तुपाने सप्त धातु उत्तम प्रतीचे तयार होत असल्याने शरीराचे बल वाढते तसेच शरीराची कुठल्याही कारणाने झालेली झीज भरून निघते. वारंवार होणारया सिजनल सर्दी पडसे सारख्या आजारांनाही आळा बसतो.
तुपाने वजन चरबी वाढेल अश्या भितीमुळे बरेच लोक तुपापासुन लांब राहणे पसंत करतात. पित्तप्रकृती लोकांसाठी, बुध्दी, स्मृती, धारणशक्ती वाढविण्यासाठी तुप सर्वात चांगले स्नेह आहे. गाईचे दुध व तुप सात्विक पदार्थ असल्या कारणाने मनाच्या सात्विकतेसाठी व्यसनांपासुन संरक्षणार्थ तुप व दुधाचा उपयोग होतो. फक्त योग्य सल्ल्याने वापर करणे आवश्यक.
नविन ताप आला असताना दुध तुपाचे सेवन करू नये. आजारी व्यक्तीत वैद्याच्या सल्ल्यानेच दुध तुपाचे सेवन करावे. कारण आजारानुरूप पथ्यापथ्यात काही प्रमाणात बदल होतो.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड
Mob — 9028562102, 9130497856
( for what’s up post send your messege on what’s up no — 9028562102 )

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s