Ayurved · Health

चांगल खा, चांगल दिसा !

चांगल खा, चांगल दिसा !
जैसा खाये अन्न वैसा होवे मन ही हिंदी म्हण आपण कधीना कधी ऐकली असेलच . पण आपण जसा आहार घेतो त्याचा प्रभाव आपल्या सौंदर्यावरही आढळतो हे सुध्दा तितकेच खरे आहे. आयुर्वेद शास्त्रात तर आधीपासूनच या बद्दल विस्तारीत वर्णन आढळते की आपण तिखट मीठ जास्त खाल्ल तर आपले केस लवकर पांढरे होतील किंवा चेह­यावर पिंपल्सचे प्रमाण वाढू शकते इत्यादी. पण इतक्या दिवस आपल्याला हे सगळ थोतांडच वाटायचं ! आहाराचा आणि सौंदर्याचा काय म्हणून संबंध अशीच सर्व साधारण सर्वांची विचारसरणी . पुर्वी डॉक्टरांकडे औषधोपचार करताना रुग्णाने जाताना हळुच विचारावे की डॉक्टर साहेब खाण्यापिण्यात काय घ्यायचे, काय नको ? तर डॉक्टर या प्रश्नाला तितकसं महत्त्व न देता म्हणायचे, नाही तसं काही नाही सगळं चालतं थोडं तेलकट वगैरे नका घेऊ. एवढयातच समोरच्याची बोळवण करायची . पण आज चित्र बदललय बरं का ! आज एम. डी. फिजिशियन असो की कुठल्याशा वैद्यकीय विषयातील विशेष तज्ञ असो आहाराविषयी रुग्णास सविस्तर माहिती देतात. कित्येक डॉक्टरांच्या रुग्ण पत्रकावर तर काही खाण्यापिण्यांच्या पदार्थांची यादीच छापलेली असते. मोठया शहरात तर आपल्यास या बद्दल आहारतज्ञांनाच भेटावे लागते, मग आपल्या आजारानुसार ते तज्ञ आपणास पुर्ण पथ्याची यादी देतात .मात्र आयुर्वेद शास्त्रात थोडया थोडक्याने भागत नाही आपण कुठला पदार्थ घेता, किती घेता, कसा बनविता, कशा पद्धतीने खाता, कुठल्या वेळेत खातात व कुठल्या स्थळी खातात या सर्व बाबीवरुन त्या पदार्थाचे गुण दोष आपणास लाभतील .

आजच्या तरुण पिढीचे सर्व साधारण पणे आयडियल असतात करीना, कॅटरीना, दिपीका वा रणधीर कपुर किंवा एखादा खान. तर ही सिलेब्रिाटी मंडळी ग्लॅमरच्या दुनियेशी संलग्न असल्याने त्यांना आपल्या डायट विषयी खूप सजग राहावं लागते, त्यांचा व्यायाम त्यानुसार त्यांचा आहार या बाबत पुरेपुर काळजी ही घ्यावीच लागते. खूप नियंत्रण करतात बरं ही मंडळी खाण्यापिण्यावर नाहीतर आपण आवडता पदार्थ आला समोर की घ्यायचं गच्च पोट भरुन नाही तर राहीच दिवसभर उपाशी तर आपल्यालाही नटनटयांसारखं सुंदर सुदृढ व्हायचं असेल तर आपल्याला देखील आपल्या डायटची काळजी ही घ्यावीच लागेल .आपण आपल्या फिटनेस साठी काहीना काही व्यायाम प्रकार करावाच लागतो, चालणे – पळणे, सुर्यनमस्कार, योगासने काहीही करा, पण आपल्या स्वत:साठी आपण 25 ते 35 मिनीटे रोज देणे हे आवश्यक आहे. व्यायामात किंवा आपल्या रोजच्या शारीरिक हालचालीत आपले स्नायू ताणल्या जातात, कधी कधी तुटतातही पण अशा वेळी पौष्टीक आहार घेतला तर हे स्नायू पुन्हा पुर्ववत होऊ शकतात. पण असा आहार वेळीच घेतला गेला नाही तर स्नायूंना योग्य शक्ती पुरवली जाणार नाही व ते कमजोर होऊन परिणामी तुम्ही देखील अशक्त व्हाल. त्यासाठी व्यायाम आहार यांचा समतोल व्यवस्थित साधलाच गेला पाहिजे पण अनेक वेळा आपण बघतो की सर्वांचा कल पौष्टीक खाण्यापेक्षा चविष्ट खाण्याकडे अधिक असतो. जसे बर्गर, पिझ्झा, भेळ, कोल्डड्रिक्ंस, पाणीपुरी इत्यादी इत्याादी. आणि विश्वास ठेवा यात शुन्य टक्के पोषक द्रव्ये असतात, असतं फक्त फॅट. ही चरबी आपल्या शरीरात जाऊन जाऊन आपण लठ्ठ होऊन जातो मग सुस्ती, जडपणा, आळस, अधिक झोप, रोजच्या दैनंदिन क्रिया मंदावणे, उत्साह नसणे अशी लक्षणे सुरु होतात. मुलींमध्ये पीसीओडी म्हणजे अनियमित पाळी, चेह­यावर लव वाढणे, वजन वाढणे, पिंपल्स येणे अशी लक्षणे आढळतात . तर कधी थायरॉइड डिसऑर्डर किंवा ऐन पंचवीशीत बीपी किंवा मधुमेहासारखे गंभीर आजार उद्भवतात. तरुणांना या आजारांचे गांभीर्य कळणार नाही, पण सौंदर्यासाठी तर आपण निश्चित चंागलं चंागल्ंा खाण्यावर भर देऊ शकतो ना… वि·ाास नसेल वाटत तर तुमच्या इंटरनेट वर सर्च करा, एखादया हिरो किंवा हिरोईनचा डायट शेडयुल. तुम्हाला लक्षात येईल ही मंडळी प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, अॅन्टीऑक्सीडेंटस यांचा खूप चांगला ताळमेळ दिवसभराच्या टाईट शेडयुल मध्ये बसवितात. जितकी रसरसीत फळे तुम्ही खाल तेवढी तजेलदार त्वचा तुमची होणार. जितक्या रंगबिरंगी फळभाज्या तुम्ही घ्याल तेवढा तुमचा ग्लो वाढेल, केसांची चमक वाढेल. जेवढा सात्विक आहार तुम्ही घ्याल तेवढी तुमची प्रतिकार शक्ती वाढेल. म्हणजे पौष्टीक व योग्य आहाराच्या सेवनाने तुम्हाला निखळ सौंदर्य तर प्राप्त होईलच पण सोबत आरोग्याचा देखील पाया मजबुत होत राहणार. इति शुभम् ।

द्वारा :- डॉ. सौ. कविता पवन लड्डा

आयुर्वेदाचार्य

लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय लड्डा स्किन अॅण्ड हेल्थ केअर सेटंर गर्भसंस्कार केंद्र,

पदमा नगर,

बार्शी रोड लातूर

. mo. 09326511681

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s