Ayurved

घरोघरी आयुर्वेद‬

सुहागरात’ला गरम दुधाचा पेला दाखवणं हे तसं हिंदी चित्रपटसृष्टीने प्रसिद्ध केलेलं समीकरण. मात्र; त्यामागे प्रथा-परंपरा यांचा आधार आहेच. दुधाला केवळ एखाद्या ‘ग्रंथीचा स्राव’ या स्वरूपात न पाहता; शरीरातील सातही धातूंच्या उत्तम अंशातून बनलेले द्रव्य म्हणून आयुर्वेद पाहतो. आयुर्वेदाने दूध हे तत्काळ शुक्रोत्पत्ती करणारे आहे असे म्हटले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजही कित्येक आखाड्यांमध्ये कसरत झाल्यावर ‘धारोष्ण’ दूध पिणे हा पहिलवानांचा नित्यक्रम असतो. पहिलवानांचा नियमित खुराक म्हणून बनवली जाणारी थंडाईदेखील बनते ती दुधातच!!

     दूध हे शुक्रधातुसाठी विशेष करून चांगले मान्य केले आहे. म्हणूनच; अपत्यप्राप्तीकरता प्रयत्न करण्यासाठीची औषधे दुधातून घ्यावीत असा वैद्यांचा सल्ला असतो.

आधुनिक विज्ञानातील काही संशोधनांनुसार; दुधातील ‘testosterone’ हे हार्मोन हे पुरुषांमधील हेच हार्मोन वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने पुरुषांसाठी दूध हा उपयुक्त आहार आहे. थोड्क्यात; परिभाषा बदलल्या तरी सत्य बदलत नसते!!

मात्र; वरील गुणधर्म हे देशी गाय/ म्हशीच्या दुधाचे आहेत. हार्मोनची इंजेक्शने टोचून निर्माण केलेली ‘चार पायांची दुधाची यंत्रे’ अशा गुणाचे दूध देणे अवघडच. किंबहुना अशा दुधातले हार्मोनचे अतिरिक्त प्रमाण हे घातक असते असेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे; स्थानिक गोशाळा वा तबेल्यांतूनच दूध घेणे इष्ट. मुंबई-पुण्यात कुठल्या आल्यात गोशाळा? या प्रश्नावर ‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ हेच एकमेव उत्तर आहे!!

जरी ‘अमृतुल्य’ असले; तरीसुद्धा दूध पिणे कधी टाळावे हे उद्या पाहूया………..

© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

(टीप: कृपया लेख शेयर करताना लेखकाच्या नावासहच करावा. नाव वगळून त्याच्या मेहनतीचा अपमान करू नये. आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारार्थ हा लेख; लेखकाच्या नावासह शेयर करण्यास आपले स्वागत आहे.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s