Ayurved

घरोघरी आयुर्वेद‬

अन्नपदार्थ शिजवत असताना ‘नॉन स्टिक’ भांड्यांचा वापर शक्यतो टाळावा. त्यांच्या कोटिंगसाठी वापरले जाणारे PTFE (Polytetrafluoroethylene) सारखे घटक हे पोटात गेल्यास आरोग्याला घातक असतात. (असे आयुर्वेद नाही तर आधुनिक विज्ञानच सांगते!)
अशी भांडी/ पॅन वापरणे अनिवार्यच असेल तर किमान दोन पथ्ये अवश्य पाळावीत.

१. अशा भांड्यांत पदार्थ शिजवताना ते मंद आचेवर शिजवावे. आच तीव्र असल्यास; त्यातून निघालेल्या वाफा श्वसनावाटे शरीरात जाऊ शकतात. यानेही फुफ्फुसे, हृद्य आणि यकृतासारख्या अवयवांना अपाय संभवतो.
२. अशा भांड्यांना हलकासादेखील चरा पडल्यास ती वापरू नयेत. भांड्यांना आलेल्या अशा ओरखड्याच्या कडांमधूनदेखील यातील आवरणाचे घटक त्यात शिजवल्या जाणाऱ्या अन्नात मिसळत राहतात आणि शरीरात विषार निर्माण करत राहतात. हे विषार कँसरसारख्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे; अशा भांड्यांना चरा पडल्यास ती फेकून द्यावी!!

नियमितपणे अन्न शिजवण्यासाठी कल्हई केलेली भांडी, लोखंडी वा मातीच्या भांड्यांचा वापर करावा. जेणेकरून; किमान रोजच्या ‘पूर्णब्रह्म’ अन्नाच्या माध्यमातून आरोग्यास अपायकारक घटक आपल्या शरीरात जाऊ नयेत.
उत्तम खा….स्वस्थ रहा!!

© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

2 thoughts on “घरोघरी आयुर्वेद‬

  1. My name is madhavi Gokhale Kaulgi
    I am a music therapist.
    I would like to publish my articles in your publication regarding संगीतोपचार so that more people will know our rich heritage of healing through music.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s