Ayurved · Health

घरोघरी आयुर्वेद‬

“आमच्या सोनूला सर्दी झाल्येय. काय करावं काही सुधरत नाहीये.”

“हे घे…माझ्या मुलाला सर्दी झाली होती तेव्हा त्याच्या वैद्यांनी हेच चाटण मधातून घ्यायला सांगितलं होतं. खूपच परिणामकारक आहे हं. जेमतेम दोन वेळाच दिलं मी. पण सर्दी गायब. देते हं मी तुला आणून.” लगेच शेजारच्या काकू चूर्ण आणून देतात.

मात्र; तेच ‘परिणामकारक चाटण’ घेऊन सोनूला काहीच फरक पडला नाही. असं का बरं व्हावं?! कारण; ‘रोग आणि औषध’ असे ठोक उपचार आयुर्वेदाकडे नाहीतच मुळी!! इथे सर्दी-खोकला जरी असेल तरी तो वात/ पित्त/ कफ वा अन्य काही कारणांमुळे आहे का याचा विचार सर्वप्रथम केला जातो. मग रुग्णाचे वय, लिंग, प्रकृती, बल, सुरू असलेला ऋतू अशा अनेक पैलूंचा विचार करून तुमचा वैद्य जे औषध देतो ते ‘त्या रोगावर’ नसून ‘त्या व्यक्तीसाठी’ असते. एकाच रोगाने ग्रस्त चार विविध रुग्णांना दिले जाणारे आयुर्वेदीय उपचार हे पूर्णतः एकसारखे असत नाहीत; तेच याच कारणामुळे. प्रत्येक व्यक्तीनुसार स्वतंत्रपणे विचार करून औषध देणे; म्हणजेच ‘customized treatment’ हे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे.

त्यामुळेच; तुम्ही आजारी पडलात तर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या वैद्यांकडे जा. शेजारी-पाजारी, वर्तमानपत्रे- दूरदर्शन जाहिराती ही माध्यमे म्हणजे काही वैद्यकीय तज्ज्ञ नव्हेत. त्याचप्रमाणे; तुमच्यासाठी दिलेले औषध तुमच्यापुरतेच मर्यादित ठेवा. इतरत्र वाटत सुटण्यासाठी औषधे म्हणजे काही खिरापत नव्हेत! त्यामुळे अशा वाटपाच्या नादी कृपा करून लागू नका.

© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

(टीप: कृपया लेख शेयर करताना लेखकाच्या नावासहच करावा. नाव वगळून त्याच्या मेहनतीचा अपमान करू नये. आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारार्थ हा लेख; लेखकाच्या नावासह शेयर करण्यास आपले स्वागत आहे.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s